• Home
  • दिवशी (बु.) प्रकरणी नराधमास तात्काळ फाशी द्या , अन्यथा 25 जानेवारीला मुखेड तहसील समोर तीव्र निदर्शने करणार. !

दिवशी (बु.) प्रकरणी नराधमास तात्काळ फाशी द्या , अन्यथा 25 जानेवारीला मुखेड तहसील समोर तीव्र निदर्शने करणार. !

राजेंद्र पाटील राऊत

20210124_064139.jpg

नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील दिवशी (बु.) येथील पाचवर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमास तात्काळ फाशी द्या , अन्यथा 25 जानेवारीला मुखेड तहसील समोर तीव्र निदर्शने करणार. तहसीलदार यांना देण्यात आले निवेदन.
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील दिवशी (बु.)या गावातील अदिवासी समाजातील मुलीवर अनैसर्गिक बलात्कार करून तिची निघृण हत्या करणारा राक्षस बाबू सांगेवार या नराधमास तात्काळ फाशी द्या अन्यथा २५ जानेवारीला मुखेड तहसिल समोर तिव्र निदर्शने करणार असल्याचे निवेदन मुखेड सर्व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्याच्या वतिने निवेदन देण्यात आले.
यावेळी पत्रकार पवन जगडमवार , पत्रकार संदिप पिल्लेवाड ,सुर्यकांत अल्लडवाड, शिवाजी गेडेवाड,विजय लोहबंदे,शंकर नाईनवाड,हर्षवर्धन पा.बेळीकर, जयप्रकाश कानगुले, पत्रकार ज्ञानेश्वर डोईजड, असद्ध बल्की, विजय जाधव, एस.के.बबलू, सचिन पवार,दिपक लोहबंदे,वसंत जाधव,रवी गंदपवाड, अदनान पाशा, नरसिंग पोतलवाड, नितिन टोकवाड,माधव पल्लेवाड, अनिल पल्लेवाड,मानिक पालदे,लखन गायकवाड,नरेश नाईनवाड, गजानन मोरे,किरण शिंदे,पवन मिकंलवाड अदिच्या स्वाक्षऱ्या आहेत.

anews Banner

Leave A Comment