Home कोल्हापूर श्री.शाहू शिक्षण संंस्थेच्या वतीने अभिजीत गायकवाड यांचा भव्य सत्कार

श्री.शाहू शिक्षण संंस्थेच्या वतीने अभिजीत गायकवाड यांचा भव्य सत्कार

87
0

राजेंद्र पाटील राऊत

श्री.शाहू शिक्षण संंस्थेच्या वतीने अभिजीत गायकवाड यांचा भव्य सत्कार

(मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
पेठ वडगांव : हातकणंगले तालुक्याच्या वडगांव शहरामधील श्री.शाहु शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेतील सर्व घटकांना एकत्रित बांधण्याचे काम कार्यवाह मा.श्री. अभिजीत गायकवाड यांनी केले आहे. तसेच आपल्या कौशल्याचा वापर करून संस्थेचा राज्यात नावलौकिक करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. असे गौरवोद्गार उपशिक्षणाधिकारी डी.एस. पवार यांनी काढले. ते पेठ वडगांव येथे बळवंतराव यादव विद्यालयातील वरिष्ठ लिपिक व कार्यवाह अभिजित गायकवाड यांना शिक्षणतज्ञ डी.बी.पाटील आदर्श लिपिक पुरस्कार मिळाल्याबद्ल संस्थेच्या वतीने आयोजित सत्कार प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सचिव विद्याताई पोळ होत्या. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. सरदार जाधव, माजी नगरसेवक राजकुमार पोळ, रणजीतसिंह यादव,सुनील हुकेरी,नगरसेवक जवाहर सलगर, सौ.शोभा देसावळे , सौ.गिरीजा देवस्थळी,
संगीता मिरजकर, सचिन चव्हाण, अभिजित पोळ,कमलेश शिरवडेकर, आनंदराव म्हेत्रस, राजेंद्र देवस्थळी, पत्रकार विवेक दिंडे , संजय दबडे , सचिन पाटील , संतोष सणगर ,प्रकाश सावर्डेकर , सुहास जाधव , रविंद्र पाटील , एस.आर. जाधव , प्रविण जाधव ,आण्णा कामत , युवा मराठाचे संपादक मोहन शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.
माजी.नगराध्यक्षा सौ.विद्याताई पोळ म्हणाल्या,”आयुष्यात संघर्ष करत स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारे लोक खूप मोठी उंची गाठू शकतात. संस्थेतील कर्मचाऱ्यांनी केलेली प्रगती ही आम्हाला अभिमानास्पद असते.तसेच शाहू शिक्षण संस्थेच्या शाखा विस्तारात व नावलौकिकात भर टाकली, तसेच सामाजिक व राजकीय कार्यात केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले.
सत्कारास उत्तर देताना जिवाभावाच्या व घरच्या लोकांनी केलेला सन्मान हा मला जगातील सर्वात मोठा सन्मान वाटतो असे मनोगत श्री. अभिजित गायकवाड यांनी व्यक्त केले.
यावेळी मा.श्री. अभिजित गायकवाड यांच्या मातोश्री कमलादेवी गायकवाड यांचा सत्कार सौ.विद्याताई पोळ तसेच श्री.अभिजित गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार उपशिक्षणाधिकारी डी.एस.पवार यांनी केला.मानपत्राचे वाचन प्रा.अशोक चव्हाण यांनी केले. यावेळी प्राचार्य प्रदीप पाटील,पर्यवेक्षक सौ.मनिषा पोळ,पी.बी.पाटील, प्रा.बी.के.चव्हाण, सुभाष पाटील,विजय शहा, राजेंद्र माने,डी.एस. घुगरे,मनोहर परीट,आर.आर.पाटील, पृथ्वीराज पाटील,संस्थेचे माजी मुख्याध्यापक, परिसरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, जयभवानी पतसंस्थेचे पदाधिकारी, शाहू शिक्षण संस्थेचे पदाधिकारी विविध शाखांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.प्रास्ताविक प्राचार्य प्रदीप पाटील यांनी, आभार उपप्राचार्य किरण कोळी यांनी व सुत्रसंचालन प्रशांत भोरे यांनी केले.
पेठ वडगांव येथील बळवंतराव यादव विद्यालयातील वरिष्ठ लिपिक,शाहु शिक्षण संस्थेचे कार्यवाहक मा.श्री. अभिजित गायकवाड यांचा सत्कार करताना उपशिक्षणाधिकारी डी.एस. पवार, शाहु शिक्षण संस्थेच्या सचिव सौ.विद्याताई पोळ ,डाँ.सायरस पुनावाला इंटरनँशल चे संचालक डॉ. सरदार जाधव, प्राचार्य प्रदिप पाटील सर उपप्राचार्य किरण कोळी सर , श्रीमती कमलादेवी गायकवाड, सौ.अश्विनी आभिजीत गायकवाड , व यादव आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते .

युवा मराठा न्यूज नेटवर्क कोल्हापूर 

Previous articleमाथेरानच्या रस्त्याला अधिकारी कोकरे यांचे नाव
Next articleदिवशी (बु.) प्रकरणी नराधमास तात्काळ फाशी द्या , अन्यथा 25 जानेवारीला मुखेड तहसील समोर तीव्र निदर्शने करणार. !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here