Home माझं गाव माझं गा-हाणं मालेगांवच्या महिलेस “त्या”दोघींनी लाखो रुपयात विकून टाकल्याने खळबळ!

मालेगांवच्या महिलेस “त्या”दोघींनी लाखो रुपयात विकून टाकल्याने खळबळ!

106
0

राजेंद्र पाटील राऊत

मालेगांवच्या महिलेस “त्या”दोघींनी
लाखो रुपयात विकून टाकल्याने खळबळ!
(ब्युरो टीम युवा मराठा न्युज नेटवर्क)
श्रीरामपूर-अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यातील दतनगर येथील दोघांनी मालेगाव जि. नाशिक येथील एका विवाहित महिलेस केटरींगच्या कामासाठी बोलावून त्या विवाहित महिलेला चक्क मध्यप्रदेशातील इंदौर येथे एक लाख वीस हजार रुपयांत विकून टाकल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे.
याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरातल्या मोतीनगर परिसरातील युवकाने श्रीरामपूर पोलिसात फिर्याद दिली आहे की,
अनिता रविंद्र कदम रा.आंबेडकर वसाहत दतनगर श्रीरामपूर व अनिता कदम हिची मैत्रीण संगिता (पुर्ण नाव माहित नाही) या दोघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत त्या तरुणाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”माझ्या पत्नीला केटरिंगच्या कामाला येऊ द्या.
यासाठी तिला फुस लावून आणले.व त्यानंतर अनिता व संगिता यांनी तिला मध्यप्रदेशातील इंदौर येथे नेऊन अज्ञात व्यक्तीकडून एक लाख वीस हजार रुपये घेऊन आपल्या पत्नीला त्या व्यक्तीच्या ताब्यात दिल्याच्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Previous articleमुखेड तालुक्यातील उंद्री (प.दे.) येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या 1576 मतदारांनी बजावला हक्क.
Next articleशालेय शिक्षणमंत्री यांच्या हस्ते अभिजीत गायकवाड यांचा गौरव
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here