Home नांदेड मुखेड तालुक्यातील उंद्री (प.दे.) येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या 1576 मतदारांनी बजावला हक्क.

मुखेड तालुक्यातील उंद्री (प.दे.) येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या 1576 मतदारांनी बजावला हक्क.

144
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील उंद्री (प.दे.) येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या 1576 मतदारांनी बजावला हक्क.
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री (प.दे.) येथे सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने 1576 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उंद्री (प.दे.)येथील एकूण मतदारांची संख्या 1828 असून त्यातील 1576 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.त्यात प्रभाग क्रमांक 1मधील 295 पुरुष तर 261 महिला व तसेच प्रभाग क्रमांक 2 मधील 270 पुरुष तर 248 महिला व प्रभाग क्रमांक 3 मधील 268 पुरुष 234 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 20 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद असून निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून सरपंच पदाला अधिकार वाढल्यामुळे सरपंच पदाची निवडणूक चुरशीची दिसून आली.तसे मुखेड तालुक्यातील गाव कारभाराचे भवितव्य मतपेटीत बंद असून निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Previous articleराजमुद्रा ग्रुप मुखेड च्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा मुखेड येथे उत्साहात साजरा.
Next articleमालेगांवच्या महिलेस “त्या”दोघींनी लाखो रुपयात विकून टाकल्याने खळबळ!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here