Home पश्चिम महाराष्ट्र टेंभुर्णी सारख्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अभ्यासिका       

टेंभुर्णी सारख्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अभ्यासिका       

173
0

राजेंद्र पाटील राऊत

टेंभुर्णी सारख्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अभ्यासिका                                                                 युवा मराठा न्यूज नेटवर्क पुणे ग्रामीण प्रतिनिधी महादेव घोलप.
सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी ( ता . माढा ) या पन्नास हजार लोकवस्ती असलेल्या गावात आजूबाजूच्या खेडेगावातील विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाची सोय आहे . मात्र महाविद्यालयीन शिक्षणाव्यतिरिक्त स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी या विद्यार्थ्यांना पुण्यातील महागड्या क्लासेसमधून लाखों रुपये शुल्क भरून प्रवेश घेणे आवाक्याबाहेरचे होते . ग्रामीण विद्यार्थ्यांची ही कुचंबणा लक्षात घेऊन टेंभुर्णीचे ज्येष्ठ समाजसेवक बशीरभाई जहागीरदार यांनी स्थापन केलेल्या ‘ अवर ओन फाऊंडेशन ‘ या सेवाभावी संस्थेमार्फत सुसज्ज , अद्ययावत आणि वातानुकूलित ग्रंथालय आणि अभ्यासिका आता पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होत आहे .गेल्या दोन वर्षांपासून संस्थापक अध्यक्ष बशीरभाई जहागीरदार यांनी गोरगरिबांना , अपंग तसेच विद्यार्थीवर्गासाठी भरीव असे मदतकार्य उभारले आहे . रुग्णांसाठी आर्थिक मदत दिली आहे . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉक डाऊनच्या काळात अन्नदान आणि मदतकार्य उभे केले आहे .

Previous articleश्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र श्री राम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न..
Next articleनागपूर मेट्रोचा प्रवास, सुरक्षित प्रवास…!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here