• Home
  • निवडणूक आयोगाचे डोके ठिकाणावर आहे का?…मग निवडणूका घेतातच कशाला!

निवडणूक आयोगाचे डोके ठिकाणावर आहे का?…मग निवडणूका घेतातच कशाला!

राजेंद्र पाटील राऊत

state-election-commission1.jpg

संपादकीय अग्रलेख…
निवडणूक आयोगाचे डोके ठिकाणावर आहे का?…मग निवडणूका घेतातच कशाला!
वाचकहो,
आपल्या देशाची सर्वात मोठी स्वायत आणि प्रजेची शक्ती म्हणजे लोकशाही या लोकशाहीला अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य म्हणजे निवडणूका.या निवडणूकाव्दारे खरे अर्थाने जनताच ठरवते की,कुणाला आपला लोकप्रतिनिधी म्हणून सिंहासनावर बसावयाचे.त्यासाठी आदर्श आचारसंहीता देखील आहे.मात्र आता अलिकडे उतर महाराष्ट्रातील दोन ग्रामपंचायतीच्या निवडणूका मध्ये जो लिलाव पध्दतीचा झालेला अतिरेक बघितला तर या देशात खरंच नावाला तरी लोकशाही अस्तित्वात आहे का?असा प्रश्न निर्माण होतो.
एका बाजूला निवडणूक आयोग निवडणूका पार पाडतांना कुठलेही आर्थिक आमिष नको,किंवा जाती पातीचे अथवा देवा धर्माच्या नावाने निवडणूका नकोत म्हणून कठोर नियमांचे दाखले देते.मग येथे तर उतर महाराष्ट्रातल्या नंदुरबारजवळील खोंडामळी ग्रामपंचायतीचा लिलाव हा कैक लाखात झाला.त्याचप्रमाणे नाशिकच्या उमराणे गावात दोन कोटी पाच लाखात लिलाव गेला.म्हणजे हि लोकशाहीची हुकूमशाहीकडेच वाटचाल आहे की काय?असा गंभीर प्रश्न यानिमिताने भेडसावतो.
आदर्श निवडणूक प्रणालीच जर वापरायची म्हटली तर मग आर्थिक गैरव्यवहार नकोत.देवा धर्माचे नाव नकोत.असे असतानाही हा खुलेआम सुरु असलेला धांगडधिंगा व नंगानाच जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जाणारे जिल्हाधिकारी यांची काहीच नैतिक जबाबदारी म्हणून येत नाही का?
ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत सरळ सरळ आर्थिक बोली लावून लिलाव पध्दत हा आदर्श निवडणूक आयोगाच्या नजरेत भंग ठरत नाही का?जर हा भंग ठरतच नसेल,तर मग कशाला घेतात निवडणूका…आमदार,खासदार,मुख्यमंत्री ,पंतप्रधान सुध्दा बसवायला हवा लिलावाव्दारेच!म्हणजे उरली सुरली लोकशाहीची थोडी फार अब्रूही लिलावातच निघेल..!या उतर महाराष्ट्रात घडलेल्या दोघा ग्रामपंचायतीच्या घटनापासून मतदारांनी नेमका काय बोध घ्यायचा? व त्याचा काय अर्थ काढायचा हे आता खरे तर निवडणूक आयोगानेच स्पष्ट करायला पाहिजे.म्हणजे या लोकशाहीप्रधान देशात कुणीही निवडणुकावर भरोसा ठेवणार नाही.अर्थातच निवडणूकांचे बाजारीकरण झालेच आहे.”माल लगाओ माल कमावो”या प्रवृतीमुळेच लोकशाही धोक्यात आल्याचीच हि पुर्वसुचना आहे.हे मात्र खरे!

anews Banner

Leave A Comment