Home विदर्भ जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ७ अटक ५ फरार साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त,...

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ७ अटक ५ फरार साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त, lcb ची कारवाही

200

राजेंद्र पाटील राऊत

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ७ अटक ५ फरार
साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त, lcb ची कारवाही
बुलढाणा,(युवा मराठा न्युज नेटवर्क)-
देऊळगाव राजा सिंदखेड राजा रोड वरील पिंपळनेर शिवारामध्ये स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा केलेल्या कारवाईमध्ये तीन लाख ६३ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की देऊळगाव राजा सिंदखेड राजा रोड वरील पिंपळनेर शिवारामध्ये जुगाराचा डाव चालू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा तसेच देऊळगाव राजा पोलिसांना लागताच पोलिसांनी सापळा रचून सदर जुगाराच्या अड्ड्यावर छापा मारून बारा जणांविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे कारवाई केली आहे या कारवाईमध्ये आरोपी विनोद गणेश मेहेत्रे राहणार सिंदखेड राजा कोंडीबा रामभाऊ भोजने राहणार सिंदखेड राजा गुलाम नबी शेख नजीर राहणार जालना सय्यद मोसिन सय्यद कट्टू राहणार सिंदखेड राजा दिलीप गणपत ढोबळे राहणार सावखेड भोई सय्यद युसूफ सय्यद उस्मान राहणार देऊळगाव राजा सिद्धांत आनंदराव खांडेभराड राहणार देउळगाव राजा यांच्यासह अधिक सात आरोपी वर कायदेशीर कारवाई केली असून यातील पाच जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सदर कारवाईमध्ये नगदी एक लाख १७ हजार पाचशे रुपये ७ मोबाईल सहा मोटर सायकल असा एकूण ३ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा lcb पथकाने हस्तगत केला. या कारवाही साठी बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चवरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बुलडाणा आणि खामगाव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गीते यांच्या आदेशाने पीएसआय शेळके, जिंदमवार, आढाव, पोलीस हेडकॉन्स्टेबल काळे, पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख, गोरले, भुजबळ, भिसे यांनी केली आहे. याबाबत अधिक तपास देऊळगाव राजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार संभाजी पाटील व श्रीकृष्ण गवई करीत आहेत.

Previous articleविदर्भातील शेंडगाव येथे आगमनाप्रित्त्यर्थ श्री राजेंद्रशेठ खैरनार साहेबांचे स्वागत -स्वागत!!अभिनंदन!!अभिनंदन!!
Next articleनिवडणूक आयोगाचे डोके ठिकाणावर आहे का?…मग निवडणूका घेतातच कशाला!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.