• Home
  • रावणकोळा मुक्रमाबाद रस्त्याची साईड पट्टी भरण्याचे त्वरित आदेश द्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबर कर यांची मागणी..

रावणकोळा मुक्रमाबाद रस्त्याची साईड पट्टी भरण्याचे त्वरित आदेश द्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबर कर यांची मागणी..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201223-WA0025.jpg

रावणकोळा मुक्रमाबाद रस्त्याची साईड पट्टी भरण्याचे त्वरित आदेश द्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबर कर यांची मागणी..

मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुक्रमाबाद – उदगीर देगलूर राष्ट्रीय महामार्गावर रावणकोळा मुक्रमाबाद रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे दुरुस्तीमुळे रस्त्याची उंची वाढली आहे रस्ता अरुंद झाला असून प्रवाशांना रहदारीस अडथळा निर्माण होत आहे वाहतूक करीत असते वेळेस एकमेकास साईड देणे अशक्य होत आहे त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे रस्ता दुरुस्तीच्या काही दिवसापूर्वी टेम्पोचा अपघात झाला आहे . अपघात रस्त्याची साईड पट्टी न भरल्यामुळे होत आहेत. म्हणून राष्ट्रीय महामार्गाच्या नांदेड विभागास रावणकोळा मुक्रमाबाद रस्त्याची साईड पट्टी भरण्याचे तात्काळ आदेश द्या. अन्यथा या रस्त्यावरील अपघात होतच राहतील त्याबद्दल संबंधित विभागावर गुन्हे दाखल करा. अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष शिव शंकर पाटील कलंबरकर यांनी केली आहे.

anews Banner

Leave A Comment