• Home
  • इ.ना.मंचच्या मागण्यांना मुख्याधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद

इ.ना.मंचच्या मागण्यांना मुख्याधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद

 

इचलकरंजी : प्रलंबित मागण्यांसाठी इचलकरंजी नागरिक मंचच्या सदस्यांनी आज मुख्याधिकारी श्री.संतोष खांडेकर यांची भेट घेतली.
प्रलंबित १८ मुद्द्यांपैकी मोकाट जनावरे, वाढते अतिक्रमण ,वृक्षसंपदा जतन करणे, सार्वजनिक मुतारी दुरावस्था , माहिती अधिकार लोगो प्रसिद्धीकरण, माहिती अधिकार दिन साजरा ,सार्वजनिक अभिलेख पाहणीकरिता उपलब्ध करणे, स्मशानभूमी पार्किंग, हायकोर्ट आदेशाचे उल्लंघन करून बसवलेले स्पीडब्रेकर कामाची चौकशी, १०७ कोटी कामातील तक्रारी, शहर वाहतूक समस्येवर तोडगा, अनधिकृत फळ मार्केट हलविणे आदि विषयावर संबंधित विभागाचे अधिकारी डॉ संगेवार, चंद्रकांत पवार यांना समक्ष बोलवून तसेच इतर विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनवर सूचना देऊन समस्या मार्गी लावण्याबाबत सूचना केल्या.
यावेळी इचलकरंजी नागरिक मंचचे राजु कोंनूर,आप्पासाहेब पाटील,उदयसिंह निंबाळकर, महेंद्र जाधव,सचिन बाबर,हरीश देवाडिगा,नागेश सुर्यवंशी, अमोल मोरे,धैर्यशील कदम,चंद्रकांत शिकलगार,दीपक जाधव,अरुण बांगड,जतीन पोतदार,अभिजीत पटवा इत्यादी इचलकरंजी नागरिक मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मोहन शिंदे- युवा मराठा न्यूज नेटवर्क.

anews Banner

Leave A Comment