राजेंद्र पाटील राऊत
पुणे ९ डिसेंबर⭕( युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे)⭕- पुणे भोसरी- महाराष्ट्रातील तांबड्या मातीतील पैलवान आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पाहिलेले स्वप्न अखेर दृष्टीक्षेपात आले आहे. मोशी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बहुउद्देशीय स्टेडिअम उभारण्यात येत आहे. या कामाला महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
पिंपरी-चिंचवड पर्यायाने भोसरी विधानसभा मतदार संघात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडिअम उभारण्याचा संकल्प ‘व्हीजन-२०२०’अंतर्गत करण्यात आमदार लांडगे यांनी केला होता. त्या अनुषंगाने तब्बल २५ हजार आसन क्षमतेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्यात येणार आहे. ११ एकर जागेवरील या उपसुचनेच्या प्रस्तावाला महापालिका सर्वसाधारण सभेत मंगळवारी मंजुरी देण्यात आली.