राजेंद्र पाटील राऊत
*टी. के.आर. एच. विद्यालय निमगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा*
निमगांव,(विशाल हिरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- आज दि. ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आर. जे. निकम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आर. जे. निकम यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.बी. बी.अहिरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी बोधपर माहिती सांगितली.
याप्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.आर. जी. पाटील, पर्यवेक्षक श्री. जी.ए.शेवाळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.