Home माझं गाव माझं गा-हाणं एम.पी.एस.सी.परीक्षा पुढे ढकललेच्या नैराश्य पोटी युवकाची आत्महत्या

एम.पी.एस.सी.परीक्षा पुढे ढकललेच्या नैराश्य पोटी युवकाची आत्महत्या

110
0

आंशुराज पाटिल वेब एडीटर

एम.पी.एस.सी.परीक्षा पुढे ढकललेच्या नैराश्य पोटी युवकाची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील युवकाने आत्महत्या केली. महेश झोरे असं आत्महत्या केलेल्या तरुणांचं नाव आहे. वाढतं वय आणि एम.पी.एस.सी परीक्षा वारंवार पुढे जात असल्याचं कारण देत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाला एम.पी.एस.सी. परीक्षा वारंवार पुढे ढकलावी लागत आहे. याच गोष्टीचं नैराश्य महेशच्या मनात होतं. अखेर राहत्या घरातच त्याने गळफास घेऊन आपली जीवननात्रा संपवली. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोर्ले गावातली ही घटना आहे.
आत्महत्या करण्याअगोदर महेशने एक सुसाईड नोट लिहिली. या सुसाईड नोटमध्ये परीक्षा पुढे जात आहे म्हणून मी आत्महत्या करतो आहे, असं त्याने नमूद केलं. स्थानिक पोलीस स्टेशन लांजा येथे त्याच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महेशच्या मृत्यूबद्दल पोलिस प्रशासनाकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. रत्नागिरी पोलीस अधिक्षकांना याबाबत माहिती विचारली असता त्यांनी स्थानिक पोलिसांकडून याबद्दलची माहिती घ्या, असं सांगितलं. तर दुसरीकडे स्थानिक पोलिस पोलिस अधिक्षकांचं नाव सांगून अधिक माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. एकूणच या प्रकरणात उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहे.
महेशच्या घरची परिस्थिती प्रतिकूल असून त्याचे आई आणि वडील कामासाठी मुंबईला असतात. प्रतिकूल परिस्थिती असताना देखील अधिकारी व्हायचं स्वप्न उराशी बाळगून महेश गेले अनेक दिवस अभ्यास करत होता. मात्र नैराश्याने मनात इतकं घर केलं की महेशने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.
युवा मराठा न्युज नेटवर्क .

Previous articleभाजपा राज्य कार्यकारणी सदस्य पदी श्री गुरुनाथ पेंढारकर यांची नियुक्ती .,…
Next articleलाॅकङाऊनमध्ये गावाकङे परतलेल्या तरुणांनी साकारली अभ्यासिका
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here