Home माझं गाव माझं गा-हाणं रावळगाव साखर कारखान्याने पंधरा दिवसात कर्मचाऱ्यांना थकीत देयके न दिल्यास आंदोलन

रावळगाव साखर कारखान्याने पंधरा दिवसात कर्मचाऱ्यांना थकीत देयके न दिल्यास आंदोलन

96
0

राजेंद्र पाटील राऊत

रावळगाव साखर कारखान्याने पंधरा दिवसात कर्मचाऱ्यांना थकीत देयके न दिल्यास आंदोलन रावळगांव,( गोकुळ दळवी प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-काल दिनांक २३ नोव्हेंबर रोजी रावळगाव शुगर फ़ार्म लि च्या व्यवस्थापनास अडीच ते तीन वर्षापुर्वी सेवा निवृत्त, सेवमुक्त झालेल्या कर्मचारी, अधिकारी यांच्या प्रलंबित ग्रजूएटी व रजाबील त्वरित अदा करावे या बाबतचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघा तर्फे देण्यात आले, निवेदनावर नासिक जिल्हा उपाध्यक्ष श्री हरीदादा निकम, नासिक जिल्हा सरचिटणीस अमोल निकम तसेच नासिक शहर अध्यक्ष श्री चंद्रकांत बनकर यांच्या सह्या आहेत,कंपनी प्रतिनिधि यानी निवेदन स्विकारले, ग्रजूएटी कायदा 1972 प्रमाणे कामगार किवा अधिकारी रितसर सेवामुक्त झल्यावर ग्रजुएटी ही 1 महीन्याच्या आत देणे कायदयाने बंधनकारक असताना कंपनीने त्यास टाळाटाळ केली व कायदेभंग केला आहे मराठा महासंघाचे पदाधिकारी श्री विष्णू अहिरे यानी ही देयके मिळणे साठी अनेकवेळा लेखी व प्रत्यक्ष भेटून विनंती केली तरी देखील सेवामुक्त होउन 28 महिने होवुन देखील तसेच दिवाळी सण येवुन गेला तरी कंपनी मालकाला पाझर फुटला नाही या पलिकडे काही जवळ राहणारे व दबाव आनंणारे 5 कर्मचारी याना ग्रजूएटी देवू करुन बाकिच्या कामगार अधिकारी यांचा विचार केला नाही या बाबत विचारणा केली असता उड़वा उडवी ची उत्तरे व्यवस्थापना कडून मिळालीत अखेर मराठा महासंघाने याची गम्भीर दखल घेत निवेदन दिले त्यात 15 दिवसाच्या आत सर्व देयके देण्यात यावेत तसे न झाल्यास कायदयाच्या चौकटीत राहून आंदोलन छेडले जाईल व त्यावेळी होनारे परीणामास व्यवस्थापन जबाबदार राहील. अमोल निकम यानी संपुर्ण निवेदन हे कंपनी प्रतिनिधि निनाद कुलकर्णी याना वाचुन व समजावुन सांगितले, आता सहनशीलतेचा अंत झाला असुन सेवानिवृती आर्थिक आवक बंद झालेमुळे आर्थिक शोसन होवुन या कामगारांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे त्यातून त्यांचे काही बरे वाईट झाल्यास त्यास कंपनी मालक जाबबदार राहतील, या निवेदनाच्या प्रती कामगार उपयुक्त, जिल्हाधिकारी तसेच पोलीस प्रशासन याना देण्यात येत आहे, कामगार उपायुक्त यानी त्वरित ग्रजूएटी कायदा 1972 प्रमाणे कंपनीला विचारणा करावी व आंदोलनाची वेळ आणू नये, निवेदन देते वेळी जिल्हा उपाध्यक्ष हरीदादा निकम, जिल्हा सरचिटनिस अमोल निकम, तसेच दाभाडी व रावळगाव येथील पदाधिकारी विष्णू अहिरे, मंगेश निकम, रावसाहेब निकम,भारत निकम,अशिष निकम, एकनाथ पगारे, राजेंन्द्र गिरी पवार,, नितीन पाटील, गजानन पवार, सन्दीप खैरनार, शंकर अहिरे, भालचंद्र अहिरे , योगेश पवार तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते, निवेदन प्रत माहितीसाठी वडनेर खाकुर्डी पोलिस स्टेशन याना त्वरित देण्यात आली आहे

Previous articleवधु/वरांच्या इच्छुक पालकांना एक महत्त्वाचा शुभ संदेश☝️
Next articleनगाव शिवारातून सहा लाख रुपयांचा गुटखा जप्त;एका आरोपीला अटक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here