*प्रविण गाढे यांचे अल्पशा आजाराने निधन*
निमगांव,( विशाल हिरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- निमगांव ता.मालेगांव येथील हाँटेल मोतीमहल व लाँन्सचे संचालक प्रविण(पिंटूभाऊ) किसन गाढे यांचे नुकतेच वयाच्या ४३ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
प्रविण गाढे हे प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावामुळे निमगाव परिसरात सुपरिचीत होते.गेल्या काही दिवसापासून त्याचेवर रुग्णालयात उपचार सुरु होते.त्यांच्या पश्चात आई, भाऊ,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे,निमगावचे माजी सरपंच ओंकार नंदाळे यांचे ते भाचे होत.गाढे व नंदाळे कुटूंबावर कोसळलेल्या दुःखात युवा मराठा न्युज परिवार सहभागी आहे.