*नांदेड जिल्ह्यातील सगळ्याच गावातील सुधारीत पैसेवारी जाहिर*
जाहूर,(मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-नांदेड दिनांक ६ नोव्हेंबर. जिल्हा प्रशासनाने खरीप हंगाम २०२०-२१ या नावाची सुधारित पैसेवारी ५०पेक्षा च्या खाली जाहीर केली आहे. या जिल्ह्यातील सर्वच १५६२ गावांचा समावेश आहे. या पूर्वी नजर अंदाज पैसेवारी पन्नास पैसेवारी जाहीर झाली होती अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील नुकसानीचे चित्र स्पष्ट होईल अशी माहिती सूत्रांनी दिली होती जिल्हा प्रशासन दरवर्षी खरीप हंगामाची पैसेवारी महसूल विभाग कृषी विभाग व जिल्हा परिषद यंत्रणेतून करण्यात आलेल्या पीक पाहणी प्रयोगाच्या आधारावर जाहीर करते यात ३० ऑक्टोबर रोजी सुधारित पैसेवारी १५ डिसेंबर रोजी जाहीर केली जाते या पैसे वारीच्या निकषावर जिल्ह्यातील खरीप पिकांचे नुकसानीचा तसेच उत्पादनाचा अंदाज धरला जातो. जिल्ह्यातील पेरणी वेळेवर झाल्या परंतु पेरणीनंतर पावसाने ओढ दिली यामुळे सोयाबीनची दोन-तीन वेळा पेरणी करावी लागली यानंतर सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या जोरदार पावसामुळे िल्ह्यातील पाच लाख ६४ हजार हेक्टरवरील खरीप पिक सह सह बागायती व फळ पिकांचे ते ३० टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले याबाबत प्रशासनाने ३८५ कोटीची भरपाईची मागणी शासनाकडे केली आहे. दरम्यान यानंतर जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे प्रशासनाच्या पैसेवारी कडे लक्ष लागले होते जिल्ह्यात १५६२महसुली गावात सात लाख८२ हजार८६७ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती.