*वडगांव व्यापारीअसोसिएशनच्या वतीने नगराध्यक्ष , मुख्याधिकारी* *यांना निवेदन*
*युवा मराठा न्यूज*
हातकणंगले तालुक्यातील वडगांव शहरातील आज सोमवार दि.०२ रोजी व्यापारी असोसिएशनच्या वतीने
नगरपालिकेच्या मुख्याधिकारी , नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले.
पेठ वडगांव शहरातील व्यांपारी असोसिएशन कडून दिवाळी स्टॉलबाबत परवानगी देताना प्रशासनाने जाचक अट घातली असुन ती रद्द करण्यात यावी ,
गेल्या सात महिन्यापासुन कोराना महामारीच्या संकटामुळे सर्वच व्यापारीवर्ग हा अडचणीत आलेला आहे .तसेच सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव थोडाफार कमि झाला असुन सर्व व्यवहार आत्ता कुठे सुरळीत चालू झाले आहे. त्यातच दिवाळीचा सन जवळ आल्याने वडगांव शहरात दिवाळी स्टाँल उभारणीसाठी वडगांव नगरपालिका प्रशासनाने जाचक अट घातल्याने
व्यापारी वर्ग अगोदरच कोरोनामुळे मेटाकुटीला आला आहे ,
चालु वर्षीचा घरफाळा व दुकान फाळा भरण्याची जाचकअट रद्द करावी व सर्व व्यापाऱ्यांना दिवाळी स्टाँल उभारणी साठी परवानगी द्यावी
यासाठी वडगांव व्यापारी असोसिएशन पेठ वडगांव यांच्या वतीने निवेदन पालिकेच्या मुख्याधिकारी सौ.सुषमा शिंदे , व नगराध्यक्ष श्री मोहनलाल माळी , नुतन उपनगराध्यक्ष श्री .संतोष चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी सालपे आघाडीच्या नेत्या श्रीमती प्रविता सालपे विद्यमान नगरसेविका , सौ.सुनिता पोळ नगरसेविका तसेच
व्यापारी असोसिएशनचे श्री.मनोज शहा , श्री.संतोष लडगे , श्री.विपुल वडगावे , श्री.प्रविण दुर्गूळे , श्री.रघुनाथ पिसे , श्री.रोहीत माळी , श्री.महादेव हावळ श्री.सतिश माळी इत्यादी व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
मोहन शिंदे 9850327474
कोल्हापूर जिल्हाप्रतिनिधी .