• Home
  • 🛑 मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यासाठी स्थगिती 🛑

🛑 मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यासाठी स्थगिती 🛑

🛑 मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यासाठी स्थगिती 🛑
✍️ नवी दिल्ली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

नवी दिल्ली :⭕ मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठविण्याच्या मागणीसाठी घटनापीठाकडे सुनावणी करण्याची मागणी होत आहे.

आज सोमवारी सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाबाबत सुनावणी ठेवण्यात आली होती. मार आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या हाती पुन्हा निराशा लागली आहे. नोकरीची नियुक्ती आणि प्रवेश प्रक्रिया यामुळे रखडणार आहे.

सकाळपासूनच सुनावणीचा मुद्दा चर्चेत आहे. आज सकाळी ११ वाजता सुनावणी ठेवण्यात आली होत, मात्र राज्य सरकारचे वकील मुकुल रोहतगी गैरहजर राहिल्याने सुनावणी काही काळ तहकूब करण्यात आली होती.

पुन्हा सुनावणी सुरु झाली असता सुनावणीला चार आठवड्यासाठी सुनावणीला स्थगिती देण्यात आली आहे.

पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे ही सुनावणी व्हावी अशी मागणी राज्य सरकार आणि मराठा आरक्षण याचिकाकर्त्यांनी केली आहे…..⭕

anews Banner

Leave A Comment