*जाहूर परिसरात जनावरांची तपासणी मोहीम संपन्न* जाहूर ,ता.मुखेड (मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)– दोन दिवसीय लसीकरण मोहीम जाहूर. आज उंदरी पदे येथे जनावरांची तपासणी करून खुरी या साथ रोगाची जनावरांना लागण होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी म्हणून लस टोचण्यात आली जाऊ येथील पशुवैद्यकीय अधिकारी श्री बिराजदार सर व ढगे सर यांनी गावात येऊन ग्रामस्थांना आपापल्या जनावरांना लस टोचण्याचे आवाहन करण्यात आले व सदरील ग्रामस्थांनी आपल्या जनावरांना खुरी ही लस टोचून सहकार्य केले सध्या पावसाळ्याचे दिवस असून साथ रोगाची लागण होऊ नये म्हणून योग्य ती जनावरांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले