Home Breaking News *थुंकीमुक्त इचलकरंजी साठी इ.ना.मंचचा पुढाकार*

*थुंकीमुक्त इचलकरंजी साठी इ.ना.मंचचा पुढाकार*

141
0

*थुंकीमुक्त इचलकरंजी साठी इ.ना.मंचचा पुढाकार*

*कोल्हापूर ( मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात कोरोनाचा संसर्गाचा प्रसार आणि मृत्युदरचा आलेख वाढत आहे , सध्या यावर आत काही प्रमाणात नियंत्रण आले असुन ,कोरोनाचा नायनाट होण्यासाठी स्वयंशिस्त गरजेची आहे. प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करत आहेच. कोरोनामुक्तीसाठी इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने थुंकीमुक्त इचलकरंजीचा निर्धार करण्यात आला. मा.शिवकुमार मुरतुले सर यांच्या संकल्पनेतून इचलकरंजी नागरिक मंचच्या कार्यकर्त्यांनी आज थुंकीमुक्त इचलकरंजी साठी कॉ. के. एल .मलाबादे चौक व महात्मा गांधी पुतळा परिसरात थुंकीमुक्त इचलकरंजी साठी जनाजगृती करण्यात आली , पोस्टर व घोषणांद्वारे नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. इचलकरंजी नागरिक मंचद्वारे पुढाकार घेऊन सुरवात झालेल्या या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाने करावी तसेच थुंकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी इ.ना.म.तर्फे करण्यात आली आहे.
या उपक्रमात इचलकरंजी नागरिक मंच चे राजु कोन्नूर ,अमित बियाणी , सुहास पाटील,शितल मगदूम , विद्यासागर चराटे , अमित सारडा , संजय डाके,उदयसिंह निंबाळकर , आप्पासाहेब पाटील सर , रविंद्र भंडारी,एड पवन उपाध्ये , सचिन बाबर ,महेंद्र जाधव , दिपक पंडित , राजु पारीख , दिपक जाधव , अमृत पारख , हरीश देवाडीगा , नितीन ठिगळे , राजेश बांगड , संजय सुतार ,लक्ष्मीकांत खंडेलवाल , पंडित ढवळे , सारंग भांबुरे , अभिजित पटवा आदि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Previous article*युवा मराठा न्युजच्या दणक्यानंतर आज होणार कौळाणे व-हाणे ग्रामपंचायतीची चौकशी*
Next article*कौळाणे,व-हाणेत ग्रामपंचायत चौकशीला आजपासून सुरुवात* *चौकशीत निष्पन्न होणार दडलेले रहस्य*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here