• Home
  • 🛑 Moto E7 Plus हिंदुस्तानमधे लॉन्च :- दमदार बॅटरी, कॅमेरा 🛑

🛑 Moto E7 Plus हिंदुस्तानमधे लॉन्च :- दमदार बॅटरी, कॅमेरा 🛑

🛑 Moto E7 Plus हिंदुस्तानमधे लॉन्च :- दमदार बॅटरी, कॅमेरा 🛑
✍️ मोबाईल विश्व 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मोटोरोला कंपनीनं हिंदुस्थानमध्ये आपला नवा स्मार्टफोन Moto E7 Plus लॉन्च केला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे 5000mAh ची दमदार बॅटरी आणि 48 मेगापिक्सलचा कॅमेरा हे आहे. 30 सप्टेंबरपासून दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर याची खरेदी करू शकता. कंपनीने फोनची किंमत 9 हजार 499 रुपये ठेवली आहे.
निळ्या आणि नारंगी रंगात हा फोन उपलब्ध आहे.

वैशिष्ट्य –
– फोनला 6.5 इंचाचा Max Vision HD + डिस्प्ले देण्यात आला आहे.
– फोनमध्ये क्वॉलकॉमचा 1.8GHz स्पीड वाला स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी एड्रेनो 610 जीपीयू देण्यात आले आहे.
– फोनला 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. मेमरी कार्डच्या मदतीने यात वाढ केली जाऊ शकते.
– फोनला रियर पॅनल फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
– 5000mAh ची दमदार बॅटरी.

⭕ कॅमेरा ⭕
फोनला ड्युल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. तर दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा आहे. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे….⭕

anews Banner

Leave A Comment