• Home
  • 🛑 ५९८ रुपयांचा प्लानः जिओ, एअरटेल आणि VI मध्ये कोणता बेस्ट🛑

🛑 ५९८ रुपयांचा प्लानः जिओ, एअरटेल आणि VI मध्ये कोणता बेस्ट🛑

🛑 ५९८ रुपयांचा प्लानः जिओ, एअरटेल आणि VI मध्ये कोणता बेस्ट🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 18 सप्टेंबर : ⭕ नुकतीच वोडाफो-आयडियाने ने ५९९ रुपयांचा प्लान आणला आहे. यासोबतच नुकतीच वोडाफो-आयडियाने ( VI) ने ५९९ रुपयांचा प्लान आणला आहे. यासोबतच एअरटेल आणि रिलायन्स जिओ सुद्धा ५९८ रुपयांचा प्लान आणला आहे. या तिन्ही कंपन्या भरपूर डेटा आणि कॉलिंगची सुविधा देत आहे. तर जाणून घ्या ग्राहकांसाठी कोणत्या कंपनीचा प्लान बेस्ट आहे.

एअरटेलचा ५९८ रुपयांचा प्लान एअरटेलचा हा प्लान ८४ दिवसांची वैधतेसोबत येतो. यात रोज १.५ जीबीची सुविधा दिली जाते. तसेच ६ जीबीचा फ्री डेटा कूपन सुद्धा यावर दिले जाते. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. तसेच रोज १०० एसएमएस सोबत एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियम आणि विंक म्यूझिकचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

रिलायन्स जिओने नुकताच आपला एक नवीन क्रिकेट पॅक प्लान आणला आहे. याची किंमत ५९८ रुपये आहे. प्लानमध्ये ५६ दिवसांची वैधता आहे. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. याप्रमाणे युजर्संना ५६ दिवसात एकूण ११२ जीबी डेटा मिळतो. यात जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंग साठी २ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तसेच रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात एका वर्षासाठी Disney + Hotstar VIP चे सब्सक्रिप्शन मिळते.

वोडाफोन – आयडियाचा ५९९ रुपयांचा प्लान एअरटेलच्या ५९८ रुपयांच्या प्लान सारखाच आहे. यात ८४ दिवसांची वैधता आहे. रोज १.५ जीबी डेटा मिळतो. तसेच २८ दिवसांसाठी ५जीबी अतिरिक्त डेटा सुद्धा मिळतो. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. तरेच रोज १०० एसएमएस दिले जाते.⭕

anews Banner

Leave A Comment