• Home
  • 🛑 महानगरपालिका कडुन २ कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मागणी – कंगणा राणौत 🛑

🛑 महानगरपालिका कडुन २ कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मागणी – कंगणा राणौत 🛑

🛑 महानगरपालिका कडुन २ कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मागणी – कंगणा राणौत 🛑
✍️ मुंबई 🙁 साईप्रजित मोरे मुंबई ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

मुंबई :⭕अभिनेत्री कंगणा राणौत आणि वादग्रस्त विधानं याचं जुनं नात आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेकडून कंगना रणौतच्या बेकायशीर कार्यालयावर बुलडोजर चालवण्यात आलं होतं. सध्या हे प्रकरण न्यायालायापर्यंत पोहोचलं आहे. आता कंगना रणौतने मुंबई महापालिकेनं तिच्या ऑफिसचं बांधकाम बेकायदेशीरपणे तोडल्याचा आरोप करत महापालिकेकडून २ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

कंगनाने महापालिकेच्या कारवाईविरोधात याआधी केलेल्या याचिकेत दुरुस्ती करत महापालिकेला २ कोटी रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंतीही तिनं आता केली आहे. ४० टक्के मालमत्तेचं नुकसान झाल्याचा दावा कंगणानं केला आहे. या प्रकारणावर पुढच्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाडून सुनावणी होईल.

हे बांधकाम अनधिकृत असल्याचे महापालिका सिद्ध करू शकली नाही तर नुकसान भरपाई म्हणून २ कोटी रुपये कंगनाला द्यावे लागतील…..⭕

anews Banner

Leave A Comment