• Home
  • 🛑 सत्ताधारी आणि विरोधकांना नागडं करुन मारु….! मराठा आंदोलकांचा इशारा 🛑

🛑 सत्ताधारी आणि विरोधकांना नागडं करुन मारु….! मराठा आंदोलकांचा इशारा 🛑

🛑 सत्ताधारी आणि विरोधकांना नागडं करुन मारु….! मराठा आंदोलकांचा इशारा 🛑
✍️ नांदेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

नांदेड :⭕ मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली.

मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यामुळे मराठा संघटना आक्रमक होताना दिसत आहेत.

याच पार्श्वभूमीवर छावा संघटनेचे अध्यक्ष नाना साहेब जावळे पाटील यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना इशारा दिला आहे.

सरकारने सर्वोच्च न्यायालयात पूर्णविचार याचिका दाखल करून मराठा आरक्षणाबाबत तात्काळ निर्णय घ्यावा नाहीतर सत्ताधारी आणि विरोधकांना नग्न करून मारू त्यासोबत उग्र आंदोलन करू यामध्ये सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत नाना साहेब जावळे पाटील यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना इशारा दिला आहे.
मराठा समाजातील अनेक कुटूंबांना शिक्षणाची आणि नोकरीची गरज आहे.

उच्च न्यायालयात हे आरक्षण टिकलं होतं त्यामुळे अनेक मराठा समाजाच्या तरूणांना नोकरीत आणि शिक्षणात फायदा झाला मात्र न्यायालयाने स्थगिती दिल्याने समाजात संतापाची भावना असल्याचं मत क्रांती मोर्चाने व्यक्त केलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणला स्थगिती मिळल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैैरीचालू आहेत….⭕

anews Banner

Leave A Comment