Home Breaking News 🛑 *रिया कशी देते वकीलांची महागडी फी? वकील मानेशिंदेंनी स्वत:च केला खुलासा*...

🛑 *रिया कशी देते वकीलांची महागडी फी? वकील मानेशिंदेंनी स्वत:च केला खुलासा* 🛑

111
0

🛑 *रिया कशी देते वकीलांची महागडी फी? वकील मानेशिंदेंनी स्वत:च केला खुलासा* 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्ती अडचणीत येताना दिसत आहे. सुशांत सिंहच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाल्यानंतर रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे.

रियाने न्यायालयीन लढाई लढण्यासाठी देशातील प्रसिद्ध आणि महागड्या वकिलाला नियुक्त केले आहे. प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे रियाची केस हाताळत आहेत. सतीश यांनी याआधी अभिनेता सलमान खान आणि संजय दत्त यांची केस हाताळली आहे.

तसेच सतीश मानशिंदे देशातील महागड्या वकिलांपैकी एक असून २०१० मधील एका रेकॉर्डनुसार ते दिवसाला १० लाख रुपये फी घेतात. मग आता प्रश्न हा उपस्थित होतो की, ‘रियाला वकील म्हणून सतीश माने शिंदेच कसे मिळाले?
‘सतीश मानेशिंदे तिच्यासाठी मोफत काम करत आहेत,’ असे रियाने राजदीप सरदेसाई या पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले होते. रियाच्या या व्यक्तव्यामुळे वकील मानेशिंदे यांच्या फिसबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते.

याबाबत वकील मानेशिंदे यांनी प्रथमच आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी कोणासाठीही मोफत काम करत नाही. परंतु, फीस हा माझा आणि माझ्या क्लायंट मधला वैयक्तिक प्रश्न असून, मी असा तो बाहेर चर्चा म्हणून बोलू इच्छित नाही,’ असे ते म्हणाले.
‘दहा वर्षांपूर्वीचे लेख वाचून फीस कोणीही ठरवू नये. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जेव्हा मला याबद्दल प्रश्न करेल तेव्हा मी त्यांना उत्तर द्यायला बांधील आहे,’ असे म्हणत तूर्तास वकील मानेशिंदे यांनी फिसच्या मुद्द्याला पूर्णविराम दिला आहे.

दरम्यान, याचबरोबर रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी सलमान खानच्या १९९८ मधील काळवीट शिकार आणि संजय दत्तच्या १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणात बाजू मांडली होती. सतीश मानशिंदे यांनी सलमान खानला ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह प्रकरणात जामीनही मिळवून दिला होता….⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here