Home Breaking News Vodafone Idea कंपनीचं नाव आता Vi (‘वूई)’, लोगोही बदलला 

Vodafone Idea कंपनीचं नाव आता Vi (‘वूई)’, लोगोही बदलला 

109
0

Vodafone Idea कंपनीचं नाव आता Vi (‘वूई)’, लोगोही बदलला

मुंबई, 8 सप्टेंबर : ⭕ टेलिकॉम कंपनी Vodafone Idea आता नव्या ‘Vi’ (वूई) नावाने ओळखली जाणार आहे. कंपनीचं नाव, लोगो – ब्रॅण्ड बदलण्यात आले आहेत. कंपनीने सोमवारी ही रिब्रॅन्डिंगची घोषणा केली. कंपनीचं नवं ब्रॅन्डचं नाव असणार आहे, . कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आपण याला  ‘We’असं वाचू शकतो. दोन्ही ब्रॅन्डचं इंटीग्रेशन टेलिकॉम जगतातील सर्वात मोठी एकीकरण आहे, असा दावा कंपनीने केला आहे.

वोडाफोन आयडियाचे एमडी आणि सीईओ रविंद्र ठक्कर यांनी नव्या ब्रॅन्डला लॉन्च करताना सांगितलं, वोडाफोन-आयडिया मर्जर २ वर्ष आधी करण्यात आलं होतं. आम्ही तेव्हापासून दोन मोठे नेटवर्क, आमची टीम आणि प्रोसेस एकत्र करण्याचं काम करत होतो, आज ब्रँन्ड सादर करताना मला खूप आनंद होत आहे, भारतीय आशावादी आहेत, जीवनात पुढेच पाऊल टाकू इच्छितात.

रविंद्र ठक्कर यांनी सांगितलं की, कंपनी मोबाईल प्लानच्या किंमतीत वाढ करणार आहे. नवीन प्लानमध्ये वाढ केल्यास ARPU सुधारण्यास मदत होईल.⭕

Previous article🛑 राज्यसेवा परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर! 🛑
Next articleराज्यस्तरीय ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार’ जाहीर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here