• Home
  • 🛑 राज्यसेवा परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर! 🛑

🛑 राज्यसेवा परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर! 🛑

🛑 राज्यसेवा परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर! 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 8 सप्टेंबर : ⭕ महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०, दुय्यम सेवा अराजपत्रिक गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा – २०२० या तिन्ही परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता राज्यसेवा पूर्व परीक्षा – ११ ऑक्टोबर २०२०, दुय़्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २२ नोव्हेंबर २०२० व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर २०२० ला होणार आहेत.

आयोगाकडून यासंदर्भात परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत एप्रिल मे २०२० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या तीन परीक्षा कोरोना संसर्गाच्या व लॉकडाऊनच्या काळात पुढे ढाकलण्यात येऊन परीक्षांचे सुधारित दिनांक संदर्भिय प्रसिद्धीपत्रकानुसार जाहीर करण्यात आले होते.

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भिय दिनांक ४ सप्टेंबर २०२० च्या परिपत्राद्वारे आयोगास कळवण्या आले आहे की, “आयोगाच्या परीक्षा आयोजनाबाबत शासनाने २६ ऑगस्ट २०२० च्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला निर्णय सदर पत्राद्वारे अयोगास अवगत करण्यात येत आहे. कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार आता आता राज्यसेवा पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २२ नोव्हेंबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबरला होणार आहे.⭕

anews Banner

Leave A Comment