• Home
  • *अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना प्री मँट्रीक , पोस्ट मँट्रीक नँशनल काँलरशिप*

*अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना प्री मँट्रीक , पोस्ट मँट्रीक नँशनल काँलरशिप*

*अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना प्री मँट्रीक , पोस्ट मँट्रीक नँशनल काँलरशिप*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

हातकणंगले तालुक्यातील
इचलकरंजी शहर बागवान जमीयत, बागवान जमियत बैतूलमाल कमिटी, बागवान जमियत शैक्षणिक समिती यांच्या संयुक्त विध्यमाने अल्पसंख्यांक समाजातील विध्यार्थ्यांना प्रि मॅट्रिक व पोस्ट मॅट्रिक नॅशनल स्कॉलरशिप सन २०२० / २०२२ चे ऑनलाईन अर्ज भरुन घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या कार्यक्रमाच उद्धघाटन समारंभ इचलकरंजी शहर बागवान जमियतच्या ऑफिस मध्ये प्रमुख पाहुणे मा. श्री.कैसभाई बागवान,मा.श्री.इरफानभाई बागवान, मा. श्री.इम्रानभाई बागवान, मा. डॉ.जावेदभाई बागवान, मा.श्री.इम्तियाज म्हैशाळे सर, मा.श्री.शहानूर कमलशाह सर यांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी मान्यवरांचा स्वागत व प्रास्ताविक मा.श्री.शफिक बागवान व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र ए.टी.कामगार संघटनेचे इचलकरंजी आगाराचे सचिव मा.श्री.जावेद बागवान यांनी केले मान्यवरांचा सत्कार संचालका कडुन करण्यात आला. या प्रसंगी मा. इम्तियाज सर, मा. शहानूर सर यांनी स्कॉलरशिप बद्दल सविस्तर माहिती दिली. मा. कैसभाई यांनी इचलकरंजी व ग्रामीण भागातील अल्पसंख्यांक समाजातील विध्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले शेवटी सर्व मान्यवर व संचालकांचे आभार मा.श्री.सादिक बागवान यांनी मानले.या कार्यक्रमा वेळी इचलकरंजी शहर बागवान जमियत, बागवान जमियत बैतूलमाल कमिटी, बागवान जमियत शैक्षणिक समिती चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रम सुरू केल्याने इचलकरंजी शहरातुन बागवान जमियत बैतुलमाल कमिटीचे कौतुक होत आहे.

anews Banner

Leave A Comment