*वडगांव नगरीचे ग्रामदैवत श्री* *महालक्ष्मी सुवर्ण महोतस्व*
*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*
*सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ* *साधिके , शरण्ये त्र्यंबके गौरी ,* *नारायणी नमोस्तुते .*
हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहराचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवी मुर्ती प्राणप्रतीष्ठा विधीला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली.
दि.२८ आँगस्ट १९७० या शुभ दिनी श्री महालक्ष्मी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा विधीवत करणेत आली होती.
श्री महालक्ष्मी प्राणप्रतिष्ठा समिती मार्फत लोकाश्रय वर हा विधी होम हवन, तिर्थ प्रसाद ,व महानैवद्य वगैरे धार्मिक विधी पुर्ण केल्या .
आणि श्री महालक्ष्मी मंदिराचा जिर्नोद्धार करणेत आला होता.
यावेळी कोल्हापूर चे श्रींमत छत्रपती महाराज सरकार यांच्या मार्फत महाप्रसादाचे आयोजन केले होते.
मेजर जनरल हिज हायनेस सर श्री शहाजी छत्रपती महाराज साहेब आँफ कोल्हापूर यांनी महाप्रसादासाठी १००१ रूपये तसेच हर हायनेस स.सौ.स.प्रमिलाराजे छ्त्रपती महाराणी साहेब आँफ कोल्हापूर यांनी ५०१ रूपये देणगी दिली होती.
यावेळी वडगांव नगरीचे व परीसराचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मंदिराच्या पुजेचा माण वडगांव शहरातील गुरव समाजाकडे आहे.
सर्व भक्तांना अभय देणारी , सर्वांचे मंगल करणारी ,सर्वाना चैतन्य आनंद , जगण्याची उर्जा देणारी , या आई महालक्ष्मी मातेस सर्व भक्तांचा साष्टांग नमन.