• Home
  • *कर्नाटकात रात्रीच्या अंधारातच संगोळी रायन्नाचा पुतळा बसविला*

*कर्नाटकात रात्रीच्या अंधारातच संगोळी रायन्नाचा पुतळा बसविला*

*कर्नाटकात रात्रीच्या अंधारातच संगोळी रायन्नाचा पुतळा बसविला*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*

बेळगाव जिल्ह्यातील  पिरणवाडी गावच्या प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात संगोळी रायण्णा यांचा पुतळा बसविण्यास विरोध असून देखील कन्नड संघटनांनी ( 27) पोलिसांच्या उपस्थितीत रात्रीच्या अंधारात अखेर पुतळा बसविला. ही बाब आज सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच महिला व तरुणांनी मोर्चा काढत घोषणाबाजी करून तीव्र विरोध दर्शविला. मात्र, पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलनकर्त्यांवर जोरदार लाठीमार करण्यात आला. या सर्व परिस्थितीमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्या परिसराला छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण देखील करण्यात आले आहे. तशी नोंद देखील ग्रामपंचायत दप्तरी आहे. मात्र, बेळगाव खानापूर महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणीच संगोळी रायण्णा यांचा पुतळा उभारण्यासाठी काहीनी अनाठाई प्रयत्न सुरू ठेवले होते.
कोणत्याही प्रकारची रितसर परवानगी न घेता. शनिवार 15 ऑगस्ट रोजी पहाटेच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात इराण यांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ही माहिती पोलिसांना समजतात ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पुतळा ताब्यात घेतला होता. त्यानंतर या वादग्रस्त पुतळ्यावरून गेल्या पंधरा दिवसापासून तणावाचे वातावरण कायम आहे. यामध्ये आजी माजी मुख्यमंत्र्यांसह आणि राजकारणी देखील सहभाग घेतला होता.
पुतळ्यापासून याबाबत तोडगा निघण्याआधीच कानडी संघटनांनी काल मध्यरात्री पोलिसांच्या उपस्थितीत अखेर संगोळी रायण्णा पुतळा बसविला. विरोध डावलून पुन्हा पुतळा बसवण्यात आल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी आंदोलकर्त्याना ताब्यात घेत इतरांना माघारी धाडले. एकंदर परिस्थितीमुळे वातावरण स्फोटक बनले असून संगोळी रायण्णा पुतळा परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

anews Banner

Leave A Comment