*कोरोणाने आणले पत्रकारांवर बेरोजगारीचे दिवस*
*विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे*
कोरोनाच्या या अजस्त्र लाटेचा फटका सर्वच संस्था, व्यवसायांना बसला पण या कोरोनाच्या लाटेत सर्वाधिक वाहून गेली ती पत्रकार मंडळी. सातत्या सहने समाजाच्या अन्याय, अत्याचारावर आसूड ओढणाऱ्या लेखनीला म्यान करत, पोटासाठी चहा विक, सॅनिटायझर विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. काही पत्रकारांनी तर डबे बनव, सिक्युरिटी गार्डची नोकरी हे पर्याय पण स्वीकारले आहेत. पत्रकारांच्या जीवावर गब्बर झालेल्या मालकांना मात्र पत्रकारांना 3 महिने पोसणे जीवावर आले. ज्यांच्या जीवावर ही संपत्ती कामावलीये त्यांच्यासाठी आपल्या संपत्तीवर गदा येता कामा नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. म्हणून महाराष्ट्रातील नावाजलेल्या संपादक, वृत्त संपादक, बातमीदार, पेजमेकर, जाहिरात विभागातील तसेच अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला. परंतु आपल्यावर झालेल्या अन्यायाची साधी बातमीसुद्धा या पत्रकारांना करण्याची मुभा नाही. महाराष्ट्रात हजारो पत्रकार बेकार झालेत. पत्रकार आहे म्हणून अन्य संस्था त्यांना नोकरी देतांना हात आखडता घेतात. त्यामुळे सर्वाधिक घुसमट या क्षेत्राची होत आहे. एका मोठ्या संकटातून हा वर्ग जातोय. पण कुणालाही ना सोयर ना सुतक. पत्रकारांची एक पिढीच या कोरोनाने उध्वस्त केली आहे. त्यामुळे या पत्रकारांना मोलाचा हात देण्याची गरज आहे. कारण अजूनही हजारो पत्रकार बेकार होणार आहे.