Home Breaking News श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड-१९’ साठी एकूण...

श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड-१९’ साठी एकूण १ कोटी १८ लक्ष निधी…. संस्थेकडून यापूर्वी ५१ तर आज रु.६७ लक्ष चा दुसरा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द… अमरावती –

100
0

श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड-१९’ साठी एकूण १ कोटी १८ लक्ष निधी….

संस्थेकडून यापूर्वी ५१ तर आज रु.६७ लक्ष चा दुसरा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द…

अमरावती –

कोविड -१९ या महामारीचे संकट संपूर्ण जगावर कोसळले आहे. भारतापुरते बोलायचे झाले तर हे संकट महाराष्ट्रात सर्वाधिक असून महाराष्ट्र सरकार त्याचा मोठ्या धैर्याने सामना करीत आहे. या स्थितीत महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय श्री शिवाजी शिक्षण संस्थेने घेतला असून याचाच एक भाग म्हणून आज रुपये सदुसष्ठ लक्ष निधीचा दुसरा धनादेश श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख व कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांनी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड-१९’ साठी दिला. शासनाच्या वतीने अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी तो स्वीकारला.यावेळी संस्थेचे सचिव शेषराव खाडे हेही उपस्थित होते. संस्थेने या कार्यासाठी आतापर्यंत एक कोटी अठरा लक्ष रुपयांचा निधी दिला आहे.
शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांनी आखून दिलेल्या मार्गावर चालताना श्री शिवाजी शिक्षण संस्थेने देशातील कठीण प्रसंगी नेहमीच सामाजिक जबाबदारीचे भान जपले आहे. आपले सामाजिक कर्तव्य जपताना संस्थेचे कार्यकारी परिषदेचे सर्व पदाधिकारी, आजीवन सदस्य यांच्या स्वेच्छा निर्णयानुसार आणि संस्थेचे सर्व प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या एक दिवसाच्या वेतनाइतकी रक्कम स्वेच्छेने या कार्यासाठी देण्याचे आवाहन संस्थेने केले होते. या आवाहनाला भरपूर प्रतिसाद मिळून आजपर्यंत एकूण एक कोटी अठरा लक्ष रुपयांचा निधी जमा झाला.कोविड -१९ साठी संस्थेने एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती व प्रत्यक्षात अठरा लक्ष रुपये अधिकचा निधी देऊन या कार्यात मोठे योगदान दिले.शिव परिवारातील सर्व सदस्यांनी दिलेल्या या सहयोगाबद्धल संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी सर्वांना धन्यवाद देत भविष्यातही राष्ट्रीय कार्यात शिव परिवार असाच पुढे राहील,असा विश्वास पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
संस्थेद्वारे संचालित डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय या लढ्यात शासनाला संपूर्ण सहकार्य देत असून कोविडरुग्णांसाठी एकशेदहा बेडची व्यवस्था करण्यात आली असून वीस बेडचे आय सी यु, टेस्टिंग लॅब तसेच ऑक्सिजन सेंटरची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांनी यावेळी उपस्थित पत्रकारांना दिली.

Previous articleनांदेड जिल्ह्यात आज ५६ बाधितांची भर तर कोरोनातून १९ रूग्ण बरे व चार जणांचा मृत्यू –
Next articleकोरोणाने आणले पत्रकारांवर बेरोजगारीचे दिवस*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here