• Home
  • 🛑 नालासोपाऱ्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा उद्रेक …! 🛑

🛑 नालासोपाऱ्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा उद्रेक …! 🛑

🛑 नालासोपाऱ्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा उद्रेक …! 🛑
✍️नालासोपारा:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नालासोपारा :⭕ मुंबईतील नालासोपाऱ्या रेल्वे स्थानकावर संतप्त प्रवाशांनी गोंधळ घातला आहे.

नालासोपारा एसटी स्टँड बंद केल्यामुळे संतप्त प्रवाशांनी रेल्वेचे सरंक्षक पत्रे तोडून रेल्वे स्थानकात प्रवेश केला आणि रेल्वेने प्रवास करू द्या, अशी मागणी केली. तसेच, या संतप्त प्रवाशांनी रेल्वेच्या ट्रॅकवर उतरून गोंधळ घातला.

नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या बाजूला नालासोपारा एसटी स्टँड आहे. तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

त्यामुळे संतप्त प्रवाशांनी आपला मोर्चा नालासोपारा रेल्वे स्थानकाकडे वळवला. प्रवाशांनी रेल्वेचे सरंक्षक पत्रे तोडून रेल्वे स्थानकात प्रवेश केला.

यावेळी प्रवाशांनी रेल्वे रोखून आम्हालाही रेल्वेने प्रवास करून द्यावा अशी मागणी केली.

सध्या फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे. त्यामुळे या प्रवाशांना रेल्वेने प्रवास करण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर या सर्व प्रवाशांनी रेल्वेच्या ट्रॅकवर उतरून गोंधळ घातला. मात्र, या प्रवाशांना आरपीएफ आणि जीआरपीने ट्रॅकवरून बाजूला केला. त्यामुळे आता पुन्हा एकदा रेल्वेसेवा सुरळीत सुरु झाली आहे.

दरम्यान, कोरोना पार्श्वभूमीवर सध्या रेल्वे गाड्यांमधील गर्दी टाळण्यासाठी फक्त अत्यावश्यक सेवेत काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे….⭕

anews Banner

Leave A Comment