Home Breaking News नांदेड” आज रोजी कोरोनातून २२ रूग्ण बरे तर ४२ व्यक्ती बाधित व...

नांदेड” आज रोजी कोरोनातून २२ रूग्ण बरे तर ४२ व्यक्ती बाधित व तिघांचा मृत्यू – नांदेड, दि.१५ ; राजेश एन भांगे

2169
0

नांदेड” आज रोजी कोरोनातून २२ रूग्ण बरे तर ४२ व्यक्ती बाधित व तिघांचा मृत्यू –
नांदेड, दि.१५ ; राजेश एन भांगे

नांदेड जिल्ह्यात आज 15 जुलै रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 42 व्यक्ती बाधित तर तीन बाधितांचा मृत्यू झाला. यात दोन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. आजच्या अहवालात एकूण 263 अहवालापैकी 201 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या आता 732 एवढी झाली आहे. यातील 412 बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

आज 15 जुलै रोजी 22 बाधित बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यात पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 8 बाधित, मुखेड कोविड केअर सेंटर येथील 9, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 1 बाधित, खाजगी रुग्णालयातील 2 बाधित आणि औरंगाबाद येथील संदर्भीत झालेले 2 बाधित असे एकुण 22 बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.

मंगळवार 14 जुलै रोजी रात्री बिलोली तालुक्यातील कासराळी येथील 62 वर्षीय 1 महिला, बुधवार 15 जुलै रोजी देगलूर येथील 58 वर्षाचा 1 पुरुष, कंधार येथील 46 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा उपचारा दरम्यान शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे मृत्यू झाला. या बाधितांना उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास, मधुमेह इतर गंभीर आजार होते. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बाधितांची संख्या 39 एवढी झाली आहे.

नवीन बाधितांमध्ये नांदेड गंगाचाळ येथील 24 व 52 वर्षाच्या 2 महिला, विजयनगर नांदेड येथील 40 वर्षाचा 1 पुरुष, जुनामोंढा नांदेड येथील 52 वर्षाचा 1 पुरुष, छत्रपती चौक नांदेड येथील 44 वर्षाचा 1 पुरुष, सन्मान गार्डन वजिराबाद येथील 58 वर्षाचा 1 पुरुष, तरोडा नाका नांदेड येथील 24 वर्षाचा 1 पुरुष, शीवरोड खंडोबा चौक रंघनाथनगर नांदेड येथील 33 वर्षाचा 1 पुरुष, वाजेगाव येथील 20 वर्षाचा 1 पुरुष, धनेगाव येथील 18 व 29 वर्षाचे 2 पुरुष, देगलूर रोड देगलूर येथील 65 वर्षाची 1 महिला, मोतेवार गल्ली देगलूर येथील 39 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर येथील नागोबा मंदिर येथील 45 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर मोतेराम तांडा येथील 60 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर तालुक्यातील होट्टल बेस येथील 32 वर्षाची 1 महिला, देगलूर येथील अंबिका नगर येथील 72 वर्षाची 1 महिला, आनंदनगर देगलूर येथील 60 वर्षाचा 1 पुरुष, माहूर येथील 38 वर्षाचा 1 पुरुष, नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील 50 वर्षाचा 1 पुरुष, नायगाव तालुक्यातील बालाजी नगर नर्सी येथील 66 वर्षाची 1 महिला, बिलोली तालुक्यातील कासराळी येथील अनुक्रमे 22,42,32,60,60,65 वर्षे वयाचे 6 पुरुष, 24 व 55 वर्षाच्या 2 महिला, मुखेड तालुक्यातील परतपुर येथील 60 वर्षाचा 1 पुरुष, मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील 42 वर्षाचा 1 पुरुष, मुखेड तालुक्यातील बामणी येथील 23,24,28 व 55 वर्षाचे 4 पुरुष, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील 75 वर्षाचा 1 पुरुष व 70 वर्षाची 1 महिला, लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील 24,23,26 वर्षाचे 3 पुरुष व 47 वर्षाची 1 महिला, लातूर सिटी येथील 42 वर्षाची 1 महिलेचा यात समावेश आहे.
आज रोजी 281 पॉझिटिव्ह बाधितांवर औषोधोपचार सुरु असून त्यातील 24 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. यात 12 महिला बाधित व 12 पुरुष बाधित आहेत. आज रोजी 377 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळी प्राप्त होतील.
आज रोजी एकुण 732 बाधितांपैकी 39 बाधितांचा मृत्यू झाला आहे. 412 बाधित हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. उर्वरीत 281 बाधितांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 74, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 86, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 32, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 14, जिल्हा रुग्णालय येथे 11, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 15, मुदखेड कोविड केअर सेंटर येथे 5, किनवट कोविड केअर सेंटर येथे 2, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 2, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 11 बाधित, माहूर कोविड केअर सेंटर 1 बाधित तसेच नांदेड शहरातील खाजगी रुग्णालयात 23 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 5 बाधित औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे
सर्वेक्षण- 1 लाख 47 हजार 990,
घेतलेले स्वॅब- 8 हजार 980,
निगेटिव्ह स्वॅब- 7 हजार 251
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 42
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 732,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 23,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- 39,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 412,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 281,
प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या 377 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here