Home Breaking News *राजगृहावरील हल्ल्याचा निषेध* *कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-*

*राजगृहावरील हल्ल्याचा निषेध* *कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-*

165

*राजगृहावरील हल्ल्याचा निषेध*
*कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-*
मुंबई येथे महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानावर काही समाजकंटकाकडून झालेल्या दगडफेकीचा कळवण तालुका रिपाइंच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
कळवणचे तहसिलदार बी.ए.कापसे.व पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन देण्यात आले.डाँ.आंबेडकारांचे वास्तव्य असलेल्या राजगृह निवासस्थानावर काही व्यक्तीनी दगडफेक करुन तोडफोड केली.या कृत्याने आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.असे निच कृत्य करणाऱ्या समाजकंटकाना तात्काळ अटक करुन शासन करावे अशी मागणी तालुकाध्यक्ष बापूसाहेब जगताप सुबोध गांगुर्ड परशुराम बस्ते भारत गांगुर्ड विलास बस्ते आदीनी केली आहे.