Home Breaking News मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज.* प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश...

मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज.* प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांचे आवाहान

164

*ई फायलिंगद्वारे* *न्यायालयीन* *कामकाज सुरळीत पार* *पाडावे.*

*मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज.*

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांचे आवाहान.

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ई फायलिंगसारखे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन न्यायालयीन कामकाज सुरळीत पार पाडावे. वकिलांनी काळानुसार बदलून इ-फायलिंगसारख्या तंत्रज्ञानाद्वारे दावे व केसेस दाखल करण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांनी केले.
सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा न्यायालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व वकिलांना ई फायलिंगचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा न्यायाधीश 3 महेश जाधव, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस.राउळ, जिल्हा बारचे अध्यक्ष आर.बी.गावडे, सचिव गुरुप्रसाद माळकर जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक संभाजी पाटील, न्यायसंकुलातील कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष विवेक घाडगे म्हणाले, देश कोव्हिड-19 मुळे लॉकडाऊन झाला आहे. न्यायालयातील कामकाज नियमितपणे चालू करण्याचे उच्च न्यायालयाने निर्देश दिल्याने पक्षकारांची गैरसोय टाळणे व वेळेत प्रकरणे दाखल करण्याकरिता ई फायलिंग प्रशिक्षणाचा सर्व वकिलांना याचा चांगला फायदा होणार आहे.

Previous article*एकही अर्जीत रजा न घेता सेवा* *निवृत्त* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज*
Next articleनांदेड” कोरोना पाॕझेटिव्ह झालेले ९ रूग्ण बरे तर १६ नवीन व्यक्ती कोविड १९ बाधित, नांदेड,दि. १ ; राजेश एन भांगे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.