Home Breaking News 🛑 नोकरी विषयक 🛑 ...

🛑 नोकरी विषयक 🛑 ⭕ अॅमेझाॅनकडुन भारतात २० हजार नोकऱ्या उपलब्ध करणार⭕ ✍️मुंबई ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

67
0

🛑 नोकरी विषयक 🛑
⭕अॅमेझाॅनकडुन भारतात २० हजार नोकऱ्या उपलब्ध करणार⭕
✍️मुंबई ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगावर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यात जगभरात आतापर्यंत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या (Amazon India Job) आहेत. याच दरम्यान ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन आता भारतात 20 हजार तात्पुरत्या स्वरुपाच्या नोकऱ्या उपलब्ध करणार आहे, अशी घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. या नोकऱ्या कंपनी ग्राहकांच्या सेवेनुसार देणार आहे. या सर्व नव्या नोकऱ्या देशातील हैद्राबाद, पुणे, नोएडा, कोलकत्ता, जयपूर, चंदीगढ, मंगळूर, इंदोर, भोपाळ, कोइम्बतुर आणि लखनऊ या 11 शहरात दिल्या जाणार (Amazon India Job) आहेत.

अ‍ॅमेझॉनच्या सर्वाधिक नोकऱ्या या व्हर्चुअल कस्टमर सर्व्हिस प्रोग्राम यामध्ये असणार आहे.
त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या वेळेनुसार काम करुण्याची सुविधा मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना ग्राहकाची गरज समजून घेऊन घर बसल्या त्यांच्यासाठी उपयोगी कस्टमाईज्ड सुविधा पोहचवणे गरजेचे आहे. या सर्व सर्व्हिस ई-मेल, मेसेज, सोशल मीडिया आणि फोनच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाईल.

‘या नोकऱ्यांसाठी कुणीही अर्ज करु शकता. अर्जदार दहावी पास असणे अनिवार्य आहे. त्यासोबत त्याला इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलुगू, आणि कन्नड भाषां लिहिता, वाचता येणे गरजेचे आहे. कंपनीने स्पष्ट सांगितले आहे की, या नोकऱ्या तात्पुरत्या असणार आहेत. कंपनीच्या गरजेनुसार आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर वर्षाच्या शेवटी त्यांना परमनेंट केले जाऊ शकते’, असं अ‍ॅमेझॉन इंडियाने सांगितले.

‘भारतात 2025 पर्यंत 10 लाख नोकऱ्या निर्माण करणार. या नवीन नोकऱ्या कंपनीच्या नेटवर्क अँड टेक्नोलॉजी आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या फील्डमध्ये असणार आहेत. या सर्व नोकऱ्या इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी, स्किल डेव्हलपमेंट, कंटेंट क्रिएशन, रीटेल आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात असतील, असंही कंपनीने सांगितले…⭕

Previous articleआईकडे जाण्यास मनाई करणाऱ्या पत्नीला मारहाण ✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
Next articleमुंबईच्या महापौर सैफी रुग्णालयात दाखल मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here