• Home
  • विनाकारण फिराल, तर वाहन जप्त होईल; मुंबई पोलिसांची नियमावली मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

विनाकारण फिराल, तर वाहन जप्त होईल; मुंबई पोलिसांची नियमावली मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 विनाकारण फिराल, तर वाहन जप्त होईल; मुंबई पोलिसांची नियमावली 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 29 जून : ⭕ राज्य सरकारने जारी केलेल्या मिशन बिगेन मार्गदर्शक तत्वानुसार शहराने विश्रांती देण्यास सुरूवात केली असल्याने नागरिकांनी वैयक्तिक सुरक्षा आणि सामाजिक अंतराचे निकष पाळण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी रविवारी केले. कोरोनाच्या संकटात मुंबईमध्ये दिवसेंदिवस रुग्ण वाढत असताना नागरिकांनी विनाकरण घराबाहेर पडू नये, असे आवाहन वारंवार पोलीस प्रशासन तसेच राज्य सरकारकडून केले जात आहे. मात्र तरीही अनेकदा मुंबईकर विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसतात. या नवीन नियमावलीत पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरताना दिसल्यास वाहन जप्त केले जाईल, असे नमूद केले आहे. तसेच पोलिसांनी दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.

➡️ अत्यावश्यक गोष्टींसाठीच बाहेर पडता येणार आहे.

➡️ बाहेर फिरताना मास्क घालणे बंधनकारक आहे.

➡️ आपल्या घरापासूनच्या २ किमी अंतरापर्यंतच्याच दुकाने आणि सलूनमध्ये जाता येणार आहे. या अंतराच्या मर्यादेबाहेर जाण्यास परवानगी नाही.

➡️ व्यायाम किंवा वॉक घेण्यासाठीदेखील २ किमी अंतराच्या परिसरातच फिरता येणार आहे.

➡️ कार्यालय आणि दवाखान्यातही २ किमीच्या परिसरातच जाता येणार आहे.

➡️ सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक आहे.

➡️ या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल.

राज्यात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा राज्यात काल ५,३१८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात आज १६७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ८६ मृत्यू हे मागिल ४८ तासांमधील तर उर्वरित ८१ मागिल कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.५७ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ८४,२४५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.९४ % एवढे आहे.आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ८,९६,८७४ नमुन्यांपैकी १,५९,१३३ (१७.७४ टक्के) नमनुे पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,६५,१६१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३६,९२५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात ५३१८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णाांची एकूण संख्या १,५९,१३३ झाली आहे.⭕

anews Banner

Leave A Comment