Home Breaking News मुंबई, ठाण्यात पुन्हा “कडक ” लॉकडाऊन ?.. ✍️( विजय वसंत पवार महाराष्ट्र...

मुंबई, ठाण्यात पुन्हा “कडक ” लॉकडाऊन ?.. ✍️( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

177
0

🛑 मुंबई, ठाण्यात पुन्हा “कडक ” लॉकडाऊन ?..🛑
✍️( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

राज्य ⭕ सरकारने अनलॉक वन जाहीर करीत आता पुन्हा लॉकडाऊन नाही, असा निर्णय जाहीर केला असला तरी प्रचंड संख्येने कोरोना रुग्णवाढ होत असलेल्या शहरांमध्ये आणि खास करून या शहरांमधील सर्व कंटेन्मेंट झोनमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन जारी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांच्या पथकानेही मुंबई, ठाण्याचा दौरा केल्यानंतर निर्बंध कडक करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली आदी ठिकाणी लॉकडाऊन कडक करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांच्या पथकाने शनिवारी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. त्यांच्यासोबत गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाचे सह सचिव आणि स्मार्ट सिटी मिशन डायरेक्टर कुणाल कुमार, केंद्रीय संचालक(आरोग्य) डॉ. ई. रविंद्रन आदीं होते. या पथकाने ठाणे जिल्हा, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी- निजामपूर आदी महापालिकांचाही आढावा घेतला. त्यानंतर पथकाने शिवाजी पार्क जवळील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते.

लॉकडाऊन शिथील केला असताना एमएमआर क्षेत्रातील महापालिका आणि पुण्यासारख्या शहरात संसर्ग वाढू लागल्याने लव अग्रवाल यांनी चिंता व्यक्त केली. या शहरांमधील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊनचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे. मात्र ते होताना दिसत नसल्याचे पथकाला आढळून आले. मुंब्रा भेटीत लोक प्रचंड गर्दीने मास्कशिवाय फिरताना दिसले. कंटेन्मेंट झोनमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवून सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले.

रुग्ण वाढ होत असलेल्या भागात कोरोना रूग्णांच्या संपर्कात आलेल्या शेवटच्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना विलगीकरणात ठेवणे आवश्यक आहे. तोपर्यंत कोरोना नियंत्रण शक्य होणार नसून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा, अशा सूचनाही या पथकाने दिल्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कोरोना संसर्ग वाढत असलेल्या ठिकाणी लॉकडाऊन अधिक कडक करण्याचे आदेश दिले. ज्या ठिकाणी कोरोना हॉटस्पॉट आढळून येतील, त्या ठिकाणी लॉकडाऊन अधिक कडक करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्या असून तशा सूचना महापालिका आणि पोलीस आयुक्तांना दिल्या जाणार असल्याचे शिंदे म्हणाले…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here