🛑 पुण्यात कोरोनानं केला चमत्कार ! पुलांवरुन दिसू लागला “सिंहगड”…🛑
✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
पुणे :⭕ पुणे शहर. एकेकाळी रिटायर लोकांचं शहर म्हणून आेळखल जायचं. बघता बघता आयटी हब झालं. पुण्यासह शेजारच्या पिंपरी-चिंचवडचाही कायापालट झाला. पण, या विकासाबरोबर हवा आणि पाणी प्रदूषणानं डोकं वर काढलं. प्रदूषित शहरांच्या यादीत पुण्याचा उल्लेख होऊ लागला. पण, गेल्या तीन महिन्यांत कोरोनामुळं करण्यात आलेल्या लॉकडाउननं पुण्याची हवा शुद्ध केलीय.
लॉकडाउनच्या काळात पुण्यातल्या रस्त्यांवर वाहनं धावली नाहीत. अर्थातच त्याचा परिणाम शहराच्या हवेवर झाला. हवेतल्या कार्बन कमी झाला. सातत्यानं धुरकट वाटणारी हवा स्वच्छ झाली. आकाश निरभ्र झालं. परिणामी काही दिवसांपूर्वी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी ही घडल्या.
पुणेकरांसाठी अभिमानाचा असणारा सिंहगड पुण्यातल्या पुलांवरून दिसू लागला. मुळात पूर्वीच्या काळात सिंहगड तसा दिसत होता. पण, वाढत शहरीकरणानं पुणेकरांचं ते सूख हिरावून घेतलं होतं. असं झालं म्हणून शहराचा विस्तार काही थांबला नाही. त्यामुळं पुन्हा पुण्यातून सिंहगड पाहता येईल, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. कोरोनां हा चमत्कार करून दाखवला. आजही झेड ब्रिज, आणि जोशी पूल, म्हात्रे पूल, वारज्याचा पूल आदी
पुलांवरून तुम्हाला सिंहगडाचं दर्शन होईल. मग कधी जाताय सिंहगडाचा फोटो काढायला..⭕