Home Breaking News गिरगाव येथील प्रकल्पबधितांसाठीच्या इमारत बांधकामास कंपन्यांचा भरघोस प्रतिसाद मुंबई ( साईप्रजित मोरे...

गिरगाव येथील प्रकल्पबधितांसाठीच्या इमारत बांधकामास कंपन्यांचा भरघोस प्रतिसाद मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

95
0

🛑 गिरगाव येथील प्रकल्पबधितांसाठीच्या इमारत बांधकामास कंपन्यांचा भरघोस प्रतिसाद 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 29 जून : ⭕ मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशद्वारे- (मुं.मे.रे.कॉ) गिरगाव येथील प्रकल्पबाधितांसाठी इमारत बांधण्यात येत असून त्यासाठी मागविण्यात आलेल्या पूर्व अर्हता निविदेला (Pre-qualification bid) बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला.
गिरगाव येथे बांधण्यात येणार असलेल्या या इमारतीमध्ये कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-३ प्रकल्पामुळे बाधित झालेले रहिवासी, व्यावसायिक व कार्यालयांचे पुनर्वसन केले जाणार आहे.

पूर्व अर्हता अर्ज दाखल केलेल्या कंपन्यांमध्ये जेएमसी प्रोजेक्ट (इंडिया), टाटा प्रोजेक्टस लिमिटेड, एल अँड टी लिमिटेड,वास्कॉन इंजिनिरिंग लिमिटेड, शपूरजी पलोनजी अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, मोंटोकारलो लिमिटेड, कॅपसाइट इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड, न्याती इंजिनिअर्स अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड, मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन लिमिटेड व नाथानी पारेख कन्स्ट्रक्शन लिमिटेड आदींचा समावेश आहे.

कॉर्पोरेशनद्वारे लवकरात लवकर पूर्व अर्हता प्रक्रिया पूर्ण करून केली जाणार आहे. या प्रक्रियेमार्फत निवडलेल्या कंपन्याद्वारे निविदा मागविण्यात येतील. गिरगाव पुनर्विकास इमारतीमध्ये ४७३ रहिवासी सदनिका, १३७ व्यावसायिक आस्थापना व १९व्यावसायिक कार्यालयाचा समावेश राहील.

या ४८ मजली इमारतीचे तीन तळ मजले सेवा तसेच पार्किंगसाठी राखीव असतील व ग्राउंड लेव्हल, एक ते सात मजले अंशतः व्यावसायिक गाळे व सेवा देण्यासाठी राखीव असतील. आठ ते नऊ मजले व्यावसायिक गाळे, सेवा तसेच सुविधांसाठी राखीव असतील. १० ते १८ मजल्यांवर व्यावसायिक गाळे तसेच सदनिका असतील व १९ ते ४८ मजल्यांवर रहिवासी सदनिका असतील. या इमारतीस कार पार्किंगची सुविधा तसेच बगीचा आदी सुविधा राहतील. एकूण ४८ मजल्यांपैकी ३९ मजले रहिवासी सदनिकांसाठी राखीव असतील.

काळबादेवी गिरगाव पुनर्वसन आराखड्या अंतर्गत ६ वेगवेगळ्या भूखंडांचे एकत्रितरित्या विकास केल्या जाणार आहेत. एकूण ६ भूखंडांपैकी के२, के३, जी३ हे भूखंड एकात्मिकरित्या विकसित केले जातील तर के१, जी १ व जी२ हे भूखंड मेट्रोसंबंधी कामांसाठी वापरण्यात येणार आहेत.

मुं.मे.रे.कॉद्वारे के३ ही इमारत बांधण्यासाठी मे. वास्काँन या कंपनीची आधीच निवड झाली असून या इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना मुं. मे.रे.कॉचे व्यवस्थापकीय संचालक, श्री. रणजित सिंह देओल म्हणाले, या कामासाठी विविध कंपन्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला याचा आनंद आहे. या पुनर्विकसित इमारती काळबादेवी व गिरगाव भूमिगत मेट्रो स्थानकाच्या संलग्न बांधण्यात येणार असल्याने हा पुनर्विकासाचा आराखडा खूप महत्त्वाचा आहे. काळबादेवी व गिरगाव येथील बरेच भूखंड लहान आहेत व रस्ता रुंदीकरणामुळे व नवीन डीसीपीआरप्रमाणे तेथे विकास होणे अशक्य होते. मात्र या प्रकल्पाच्या यशामुळे याभागात अनेक सामूहिक विकासाला चालना मिळेल असेही श्री. रणजीत सिंह देओल म्हणाले.⭕

Previous articleविनाकारण फिराल, तर वाहन जप्त होईल; मुंबई पोलिसांची नियमावली मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
Next articleफेअर ॲन्ड लव्हली ‘ च्या नावातून “फेअर” शब्द काढला ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here