• Home
  • फेअर ॲन्ड लव्हली ‘ च्या नावातून “फेअर” शब्द काढला ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज

फेअर ॲन्ड लव्हली ‘ च्या नावातून “फेअर” शब्द काढला ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज

🛑 ‘ फेअर ॲन्ड लव्हली ‘ च्या नावातून “फेअर” शब्द काढला 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕’फेअर ॲन्ड लव्हली’ हे गोरं बनवणारं क्रीम भारतात कुणाला माहिती असेल असा माणूस शोधून सापडणार नाही. सावळ्या आणि काळ्या असणाऱ्या लोकांना गोरं आणि गोरे असणाऱ्याना अजून गोरं करणारं हे क्रीम आहे, असा दावा ही फेअरनेस क्रीम बनवणारी कंपनी करत असते.

भारतातील नावाजलेली कंपनी ‘हिंदूस्थान युनिलिव्हर’ कंपनी हे क्रीम बनवते. आजवर या कंपनीवर अनेक आरोप केले गेले. हे सर्व आरोप एकाच कारणामुळे झाले आहेत. ते म्हणजे ‘अनेक वर्षांपासून लोक हे क्रीम वापरत आहेत पण गोरे काही झाले नाहीत. पण अखेर अनेक वर्षांपासून या क्रिमवर होत असलेली वर्णभेदाची टिका थांबण्यासाठी कंपनीला हा निर्णय घ्यावाच लागला.
कंपनीने मात्र ‘कंपनीची उत्पादनं ही फक्त गोऱ्या त्वचेसाठी नाहीत. याबरोबरच ‘फेअरनेस’, ‘व्हाईटनींग’, ‘लाईटनींग’ हे शब्द गोरेपणाशी संबंधीत असल्यानं त्यांचा वापरही उत्पादनांच्या नावात केला जाणार नाही, असं सांगितलं आहे.

नुकत्याच अमेरिकेत झालेल्या जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तिच्या हत्येनंतर जगभरात वर्णभेदाविरूध्द आंदोलनं पेटली. त्यामुळं अमेरिकेच्या जगप्रसिद्ध ‘जॉन्सन ॲन्ड जॉन्सन’ कंपनीनं स्किन व्हाईटनींग उत्पादनं बनवणं थांबण्याचा निर्णय घेतला होता. आता भारतात ‘हिंदूस्थान युनिलिव्हर’नेही असा निर्णय घेतला आहे…⭕

anews Banner

Leave A Comment