Home Breaking News कोल्हापुर ब्रेकिंग न्यूज* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज*. *आजअखेर...

कोल्हापुर ब्रेकिंग न्यूज* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज*. *आजअखेर 710 जणांना डिस्चार्ज* *डॉ. बी. सी. केम्पी पाटील जिल्हा शल्य चिकित्सक कोल्हापूर.*

110
0

🛑 *कोल्हापुर ब्रेकिंग न्यूज* 🛑

*मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज*.

*आजअखेर 710 जणांना डिस्चार्ज*
*डॉ. बी. सी. केम्पी पाटील जिल्हा शल्य चिकित्सक कोल्हापूर.*

*कोल्हापूर* ,दि. 24 : आज रात्री 10 वाजेपर्यंत 109 अहवाल प्राप्त झाले असून प्राप्त अहवालापैकी 96 अहवाल निगेटिव्ह तर 9 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. जिल्ह्यात आजअखेर 759 रूग्णांपैकी 710 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापूर्वी पाठविण्यात आलेला 1 अहवाल पॉझीटिव्ह आहे, 1 अहवाल नाकारण्यात आला व सोलापूर जिल्ह्यातील 2 अहवाल निगेटिव्ह आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण 41 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज रात्री 8 वाजेपर्यत प्राप्त 9 पॉझीटिव्ह अहवालामध्ये गडहिंग्लज- 1, हातकणंगले- 2, करवीर- 2, नगरपरिषद क्षेत्रात -2, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-2 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- 77, भुदरगड- 74, चंदगड- 78, गडहिंग्लज- 92, गगनबावडा- 6, हातकणंगले- 13, कागल- 57, करवीर- 23, पन्हाळा- 27, राधानगरी- 68, शाहुवाडी- 180, शिरोळ- 8, नगरपरिषद क्षेत्र- 15, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-31 असे एकूण 749 आणि पुणे -1, सोलापूर-3, मुंबई-2, नाशिक -1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 10 असे मिळून एकूण 759 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 759 रूग्णांपैकी 710 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 41 इतकी आहे.

.. .. … .. ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here