Home Breaking News इंडियाबुल्सवर सायबर हल्ला’ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज...

इंडियाबुल्सवर सायबर हल्ला’ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

96
0

🛑 ‘इंडियाबुल्सवर सायबर हल्ला’🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 24 जून : ⭕ वित्तीय सेवा गट (Financial Services Group) इंडियाबुल्सवर रॅन्समवेअर सायबर हल्ला झाला आहे. अहवालानुसार, CLOP रॅन्समवेअरचा इंडियाबुल्सवर हल्ला झाला आला असून स्प्रेडशीटमधून डेटा चोरीला गेला आहे. डेटा परत करण्यासाठी हॅकर्सनी कंपनीला २४ तास दिले आहेत. हॅकर्सनी त्यांच्या मंचांवर सहा फायलींचे स्क्रीनशॉट देखील सामायिक केले आहेत.

ब्लीपिंग कॉम्प्युटरच्या वृत्तानुसार, इंडियबुल्सवर CLOP रॅन्समवेअरचा हल्ला करण्यात आला आहे, ज्यात एनक्रिप्टेड डेटा चोरीला गेला आहे. २४ तासांच्या आत त्यांचे मागण्या मान्य न केल्यास सर्व फायली ऑनलाईन लीक होतील असे म्हणत हॅकर्सनी कंपनीला धमकी दिली आहे. हॅकर्स ग्रुपने त्याच्या फोरमवर सामायिक केलेल्या डेटामध्ये एक पत्र, एक व्हाउचर आणि चार स्प्रेडशीट आहेत. असं म्हटलं जात आहे की स्प्रेडशीट डेटा इंडियाबुल्स फार्मास्युटिकल्स आणि इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेडशी जोडलेला आहे. तथापि, हे हॅकर्स कंपनीचा सर्व डेटा चोरण्यात यशस्वी ठरले की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तसंच हॅकर्सच्या मागणीविषयीची माहिती सार्वजनिक केली गेली नाही. यावर्षी मार्चच्या सुरुवातीस अमेरिकन औषधनिर्माण कंपनी एक्झिक्युफार्मवरही CLOP रॅन्समवेअरने हल्ला केला होता ज्यामध्ये 163GB डेटा चोरीला गेला होता जो एनक्रिप्टेड नव्हता. हॅकर्सनी त्यांच्या मंचांवर हा डेटा सार्वजनिक केला.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here