🛑 शिक्षण विभागाचे ८८ शिपाई कोरोनाच्या ड्यूटीवर 🛑
✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
पुणे⭕ – महापालिका शिक्षण विभागाच्या शिक्षकांची करोनाच्या सर्वेक्षण कामातून सुटका केल्यानंतर आता शिक्षण विभागाचे सुमारे 88 शिपाई विलगीकरण कक्षात नियुक्त करण्यात आले आहेत.
दि. 21 मार्चपासून पालिकेकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम करण्यात येत होते. त्यानंतर तीन महीने हे शिक्षक याच कामात होते. तर, या विभागातील शिपाई तसेच लेखनिक यांच्याकडे या कालावधीत शाळा बंद असतानाही कोणत्याही विशेष जबाबदाऱ्या दिल्या नव्हत्या. मात्र, आता शहरात सक्रिय बाधितांची संख्या वाढत असल्याने विलगीकरणातील संशयितांची संख्याही वाढत आहे.
परिणामी, विलगीकरण कक्षात मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याने शिक्षण विभाग (प्राथमिक)चे सुमारे 88 शिपाई या कक्षांमध्ये मदतनीस म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.⭕