Home Breaking News वजन कमी करण्यासाठी या डाळी आहेत सर्वाधिक फायदेशीर ✍️ मुंबई (...

वजन कमी करण्यासाठी या डाळी आहेत सर्वाधिक फायदेशीर ✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

145
0

🛑 वजन कमी करण्यासाठी या डाळी आहेत सर्वाधिक फायदेशीर 🛑
✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

( आरोग्य विषयक)

मुंबई, 23 जून : ⭕ करिअरमधील स्पर्धा, ताणतणाव, बदलती जीवनशैली, वेळी अवेळी खाणेपिणे यामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. यामुळे काहीचे वजन कमी होते तर काही जणांचे वजन जलद गतीनं वाढते. धावपळीच्या आयुष्यामध्ये वजन वाढणे ही समस्या आता सामान्य आहे. पण यामुळे वाढत्या वजनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण वजन वाढीमुळे अनेक गंभीर आजारांना आयते निमंत्रण मिळते.

निरोगी राहण्यासाठी, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत आहाराचे सेवन करणं आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार आपल्या आहारामध्ये विविध डाळींचा समावेश केल्यास वजन घटण्यास मदत मिळू शकते. कारण डाळींमध्ये वजन कमी होण्यास पोषक असलेल्या घटकांचा समावेश असतो. वजन कमी करण्यासाठी व्यायामासह पौष्टिक आहार देखील महत्त्वाचा असतो. भाज्या, फळे, सुकामेवा याप्रमाणेच आहारात डाळींचाही समावेश करावा.

➡️ ​मूग डाळ :- मूग डाळीची खिचडी किंवा मोड आलेले मूग खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते. मूग डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीनचा समावेश आहे. साल असलेली मूग डाळ तुपासह खाल्ल्यास तुमचे कित्येक आजारांपासून संरक्षण होतं. आपल्या वेट लॉस डाएटमध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतींनी मूग डाळीचा समावेश करू शकता. मूग डाळीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते. यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही. ज्यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त फॅट्स जमा होत नाही आणि वजन देखील घटण्यास मदत मिळते.

➡️ ​मूग डाळीचे सूप :- मूग डाळीचे सूप तुम्ही पिऊ शकता. हे सूप तयार करण्यासाठी तुम्हाला मूग डाळ, लसूण, आले, मीठ, हिंग, जिरे, मीठ, बडीशेप, धने आणि हिरवी मिरची एवढे साहित्य लागेल. ही सर्व सामग्री पाण्यात उकळून घ्या आणि तुपामध्ये फोडणी देऊन त्यामध्ये मिश्रण मिक्स करा. आठवड्यातून तीन वेळा हे सूप तुम्ही पिऊ शकता.

➡️ ​कुळीथ :- तज्ज्ञांच्या माहितीनुसार वजन कमी करण्यासाठी कुळिथाचे सेवन करणे हा प्रभावी उपाय आहे. कुळिथामुळे आपल्या शरीराला आवश्यक पोषक घटकांचा पुरवठा होतो. तुम्ही शाकाहारी असल्यास आहारामध्ये कुळिथाचा समावेश करा. यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात प्रोटीन पुरवठा होतो. कुळिथाची डाळ प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन आणि खनिज हे घटक देखील मुबलक प्रमाणात आहेत. यामुळे वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारामध्ये कुळीथाचा समावेश नक्की करा.

➡️ ​मसूर डाळ :- वजन घटवण्यासाठी तुम्हाला मसूर डाळीची भरपूर मदत मिळेल. मसूर डाळीमध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि फायबर आहेत. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये कमी प्रमाणात फॅट्स असतात. मसूर डाळीमुळे तुमच्या शरीराला आवश्यक असलेले व्हिटॅमिन, प्रोटीन आणि अन्य पोषक तत्त्वांचा पुरवठा होतो. १०० ग्रॅम मसूर डाळीमध्ये ३५२ कॅलेरी असतात. वजन कमी करण्यासाठी मसूर डाळ हा एक उत्तम पर्याय आहे.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here