• Home
  • MHT-CET सह सर्व सीईटी लांबणीवर; उच्च शिक्षण मंत्र्यांची घोषणा मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

MHT-CET सह सर्व सीईटी लांबणीवर; उच्च शिक्षण मंत्र्यांची घोषणा मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 MHT-CET सह सर्व सीईटी लांबणीवर; उच्च शिक्षण मंत्र्यांची घोषणा 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 24 जून : ⭕ MHT-CET 2020: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. MHT-CET ४ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० या कालावधीत होणार होती. अन्य MAH-B.P.Ed-CET, MAH-LLB (५ आणि ३ वर्षे कालावधी अभ्यासक्रम), MAH- B.A/B.Sc.-B Ed CET-2020 (Integrated Course) या सीईटी २४ जुलै रोजी होणार होत्या.

अभियांत्रिकी, औषधनिर्माण अभ्यासक्रमांसाठी MHT-CET होते. ही परीक्षा ४ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० या कालावधीत घेतली जाणार होती. परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर केल्या जातील. एकूण ४ लाख १३ हजार २८४ विद्यार्थ्यांची आधी नोंदणी झाली होती. अतिरिक्त नोंदणी झाली ती संख्या धरून ५ लाख २४ हजार ९०७ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

सामंत म्हणाले, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET- सेल) माध्यमातून दरवर्षी उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सध्या संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात कोविड- १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थी आणि पालकांकडून या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याविषयी सातत्याने मागणी होत होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून या सर्व परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात येतील. असेही सामंत यांनी संगितले.⭕

anews Banner

Leave A Comment