एलसीबीने पकडलेल्या तीन चोरट्यांना देगलूर न्यायालयाने दिली पोलीस कोठडी
_____________*___________
नांदेड, दि.१७ ; राजेश एन भांगे
___________*____________
स्थानिक गुन्हा शाखेने पकडून तीन गुन्हेगारांना देगलूर पोलीसांच्या स्वाधीन केले होते. आज दि.16 जून रोजी देगलूर न्यायालयाने तिघांना तीन दिवस अर्थात 19 जून 2020 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
बिदर तुरूंगातून फरार असलेला आरोपी नामदेव रामकिशन भोसले आणि त्याचे दोन साथीदार भास्कर दादाराव चव्हाण तसेच चाफरान पानबाबू भोसले या तिघांना नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखा पोलीस पथकाने पकडले होते. या तिघांनी चोरीच्या घटना घडवल्याची कबुली दिली होती. देगलूर पोलीसांनी एका चोरी प्रकरणात या तिघांना आज न्यायालयात हजर केले होते. न्यायाधीशांनी या तिघांना तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले. देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळपास 1.25 ते 1.50 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याच्या तीन घटना अद्याप उघड झालेल्या नाहीत. या तिघांनी या तिन्ही चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे.
यानंतर देगलूरचे पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक ठाकुर आणि इतर पोलीस सहकारी या तिन्ही चोरट्यांना घेवून मुखेड येथे गेले. चोरट्यांच्या सांगण्याप्रमाणे तेथील एका सोनाराला त्यांनी चोरीचा ऐवज लुटलेला आहे. वृत्तलिहिपर्यंत सोनाराकडून चोरीचा माल जप्त झाला की, नाही याची माहिती प्राप्त झाली नाही. पण या तिघांनी चोऱ्या केल्याची स्पष्टता झाली आहे.