• Home
  • धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण; पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह !

धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण; पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह !

धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण; पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह ! 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

*मुंबई* :⭕ राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे नेते आणि उद्धव ठाकरे यांत्या मंत्रीमंडळातील मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे ठाकरे सरकारमधील ते तिसरे मंत्री ठरले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून रुग्णांचा आकडा कमालीचा वाढत आहे. ठाकरे सरकारमधील दोन मंत्र्यांना आधीच कोरोनाची लागण झाली होती. ते उपचार घेऊन बरेही झाले आहेत. आज सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

मुंडे यांच्याबरोबरच त्यांचा मुंबईतील चालक, बीडचा स्वयंपाकी, वाहनचालक अशा ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे. मुंडे मुंबईत आल्यानंतर या सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीचे अहवाल काल रात्री आले. यामध्ये कोरोनाची लक्षणे नसतानाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाची लागण झालेले ते ठाकरे सरकारमधील तिसरे मंत्री असे तरीही राष्ट्रवादीचे दुसरे नेते आहेत…⭕

anews Banner

Leave A Comment