*शेवटी हरली माणुसकी तिच्यासमोर आणी तीच्या गर्भासमोर काय चुकल होते तीचे…?* वाचकहो ,हेच की तीच्या पोटाला भुक लागली होती म्हणून ती अन्न समजुन तो अननस खाण्यासाठी निघाली, जो अननस गर्भ नासलेल्या माणसांनी फ़टाक्याने भरलेला होता…! तेव्हा माणसासाठी ह्याच ओळी लागू होतात माणसा माणसा तुझी नियत बेकारं…तुझ्याहून बरं गोठ्यातलं जणवारं…कसली माणुसकी ही ? कसले माणस ही ? जी आईचा गर्भ समजु शकली नाही…त्या हत्तीच्या जागेवर कधीतरी त्या माणसानी 9 महिन्याच्या गर्भवती असलेल्या स्वतःच्या आईला बघयाला हव होते तेव्हा कळली असती तिची वेदना….,
जेव्हा माणसच ठरतात माणस मारायला कारणीभूत तेव्हा काही नविन वाटत नाही बघा आम्हांला, कारण माणुसकीचा गर्भ अगोदरच नासलेला आहे, ती वागणारच माणसासारखी कारण जनावर कधीच माणसासारख वागत नाही कारण त्यांना विश्वास नाही इथल्या माणसावर आणी इथल्या हिजड्या, मुर्दाड आईचे रक्त पिउन मर्दागीचा आव आणणार्या मानुसकीवर…माणसाने घात केला तिचा विश्वासघात केला पण तीने चित्कार ही काढला नाही माणसाविरोधात कारण तिला समजल होते ही माणस नाही दानव आहेत माणसातील…म्हणून वेदना घेऊन ती जल शोधत निघाली तरी तिच्या व तीच्या गर्भाचा दाह क्षमला नाही आणी तीने जलसमाधीचा पर्याय निवडला तीने आत्महत्या केली गर्भ असलेल्या अर्भकाची माफी मागून…!
” माफ कर बाळा नको येउस जन्माला…! ही माणस आता माणस राहिली नाही, जिथ स्री जातीचे अर्भक हे सोडत नाही हे तुला काय जिवदान देतील या पेक्षा तू या जगात न आलेला बरा”
असच काहिसं बोलुन तीने जिवंत जलसमाधी घेतली ते ही चक्क माणसामूळे…! देवाने सर्वात सुंदर हुशार प्राणी बनवला होता माणूस पण आज देवाला त्याच्या निर्मीती वर लाज वाट्ली असेल, तो हत्तीनीचा जिव कासावीस होत संपत असताना बघुन…खेद व्यक्त करावा की रोष की द्वेष हा प्रश्न पडलाय आम्हांला ..? आणी आज तिला भावपुर्ण श्रद्धांजली देण्याचा कुठ्लाही अधिकार तीने माणसाला ठेवला नाही. कारण तीने माणसाला कंटाळून यातना, वेदना सोसत तळतळून जिव दिलाय हे माणसाला समजणार नाही कारण माणसाला सवय झाली आहे कुत्र्यापासुन माणसापर्यंत जिव गेला की बोट फिरवत भावपुर्ण श्रध्दांजली द्यायची एवढ सोप वाटत भावपुर्ण श्रद्धांजली देणे कीबोर्ड वर बोटे गिरवत…आज तो अधिकार तीने हिरावून घेतलाय…ती पाण्यातून बाहेर आली नाही कारण कदाचीत तिला भिती वाट्ली असावी आपला जिव ही माणस तेव्हाच वाचवतील जेव्हा आपल्या गर्भलिंग चाचणी करतील काय आहे इच्या गर्भात मग ठरवतील जिवदान द्यावे की नाही ? एवढी गेलेली माणस आहे इथली…म्हणून तीने जिव वाचण्यापेक्षा ईच्छामरण स्विकारले…अस संमजु नका तीच्या वेदना कुणालाही समजल्या नसतील…माणसाला तिच्या वेदना समजणारही नाही आणी त्याने त्या समजुन घेन्याचा निर्लज प्रयत्न करुही नका..तीच्या वेदना समजल्या आहे निसर्गाला म्हणून तो सूड घेतो आहे आणी अजुनही घेणार आहे आणी त्याने तो घ्यावा कारण माणसांची मस्ती जनावरांनी उतरवणे सोडले आहे त्यांनी त्याचा अधिकार सगळा निसर्गाला दिलाय आणी निसर्ग सूड घेईल तेव्हा म्हणू नका निसर्ग कोपलाय…! निसर्ग कधीच कोपत नाही, तो त्याचे काम करतोय अश्या हजारो मुक्या जनावरांच्या ह्त्याचे तो सूड घेतोय… कारण निसर्ग सोसत आलाय आपल्या अनेक वेदना तो आता आता त्या वेदना व्याजासह परत करतोय माणसाला…
माफ कर हत्तीनी ताई तुला भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्याचा अधिकार आमच्याकडे आज शिल्लक नाही कारण त्या माणसातील मीही एक माणुस आहे म्हणून तुला माझ्या भावपूर्ण श्रद्धांजली वरही विश्वास बसणार नाही…
लाज वाटते माणुसकीची…😥 कारण गर्भ तुझा नाही इथल्या नपुसंक माणसांचा आणी माणूसकीचा नासलाय..! त्याशिवाय राजेश खन्नाचा अभिनय असलेला हाथी मेरा साथी हा चित्रपट बघितला तरी लक्षात येते की,जनावरातील माणूसकी आजही शाबूत आहे.मात्र हिजडयाच्या औलादीचे आम्ही मुक्या प्राण्यांची काय किंमत करणार?म्हणूनच निसर्ग त्याची जाणीव आम्हांला वेळोवेळी करुनच देत आहे.तरीही आम्ही सैतानी खोपडीचे स्वार्थासाठी नको ते उद्योग करायला लागलोत,त्याचे दुष्परिणामही लवकरच आम्हांला भोगावे लागतील.हे सत्य कुणीच नाकारु शकणार नाही!