• Home
  • DTH कंपनी देतेय ६ महिने फ्रि सेवा २००० सूट आणि सेवा

DTH कंपनी देतेय ६ महिने फ्रि सेवा २००० सूट आणि सेवा

🛑 DTH कंपनी देतेय ६ महिने फ्रि सेवा २००० सूट आणि सेवा🛑
( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मनोरंजन बातम्या :⭕ टेलिकॉम सेक्टरमध्ये फ़क़्त मोबाइल फोन सेवा नाही तर, डिश टीव्ही सेवेमध्येही मोठी स्पर्धा आहे. नवीन ग्राहक जोडण्यासह आहेत ते ग्राहक कायम ठेवण्यासाठी या कंपन्या सतत नवनवीन बम्पर ऑफर देत असतात. टाटा स्काय कंपनीने तर आता ग्राहकांना ६ महिन्यांपर्यंत मोफत सेवा देण्यासह २ हजार रुपयांची सूट अशी खास ऑफर जाहीर केली आहे.

Binge+ सर्विस यासाठीची ही खास सेवा आणि ऑफर जाहीर झालेली आहे. यामध्ये ५९९९ रुपयांना मिळणारी सेवा आता ३९९९ रुपयांत मिळणार आहे. तसेच किमान ३ ते जास्तीतजास्त ६ महिने मोफत DTH सेवा ग्राहकांना मिळणार आहे. टाटा स्काई बिंज+ याची सेवा घेणाऱ्यांना एकाच रिमोटवर टीव्ही आणि डिश टीव्ही यांना ऑपरेट करण्याची खास सोय असेल.
तसेच टाटा स्काई बिंज+ एक नेक्स्ट जेनरेशन ऐंड्रॉयड सेट-टॉप-बॉक्स आहे. ज्याद्वारे आपण आपल्या जुन्याटीव्हीलाही गूगल असिस्टेंट सपॉर्ट आणि त्यांचे प्ले स्टोरवरील सर्व अॅप्लिकेशन आणि गेम यांचाही आनंद घेता येणार आहे. तसेच मनोरंजन (नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, युट्युब आदि) आणि शैक्षणिक माहिती देणारे अॅप्लिकेशन यावर ग्राहक थेट पाहू शकणार आहेत. नव्या किंवा जुन्या अशा सर्व टीव्हीला हे आपण जोडू शकतो.

anews Banner

Leave A Comment